लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या म्हाडगी-देवाडी या गावाजवळच्या वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रावर बांधण्यात येत असलेल्या पुलाचा पिलर सोमवारी मध्यरात्री अचानक कोसळला. या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही.गेल्या दीड वर्षापासून या मार्गावर पुलाचे काम सुरू आहे. बाजूला असलेल्या जुन्या पुलावरून सर्व वाहतूक सुरू असते. या पुलावरील वाढती वर्दळ लक्षात घेता, या पुलाचे निर्माण कार्य सुरु करण्यात आले होते. सुमारे ६०० मीटर लांबीचा हा पूल असून त्यासाठी नदीच्या पात्रात सहा-सात पिलर बांधण्यात आले आहेत. यातील एक पिलर अचानक कोसळला आहे. या पुलाचे काम लॉकडाऊनच्या काळातही मंद गतीने का होईना पण सुरू होते. मात्र मध्यरात्री ही दुर्घटना झाल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.
भंडारा जिल्ह्यात निर्माणाधीन पुलाचा पिलर कोसळला; जिवीतहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:31 AM
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या म्हाडगी-देवाडी या गावाजवळच्या वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रावर बांधण्यात येत असलेल्या पुलाचा पिलर सोमवारी मध्यरात्री अचानक कोसळला.
ठळक मुद्दे६०० मीटरच्या पुलाचे बांधकाम