शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 8:42 PM

महागाईने जनता त्रस्त झाली असून भाजपचे सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट रचत आहे, असा घणाघाती आरोप अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केले.

ठळक मुद्दे भंडाऱ्यात पोहचली महापर्दाफाश यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाच वर्षांपूर्वी राज्यावर दीड लाख कोटींचे कर्ज होते. ते आता पाच लाख कोटींवर पोहचले आहे. प्रत्येक शासकीय विभागात दीड लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. महागाईने जनता त्रस्त झाली असून भाजपचे सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट रचत आहे, असा घणाघाती आरोप अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केले.अमरावती येथून सोमवारी प्रारंभ झालेली महापर्दाफाश यात्रा मंगळवारला दुपारी १ वाजता भंडारा जिल्ह्यात दाखल झाली. शहरातील साखरकर सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, काँग्रेसचे प्रदेश महासचिव जिया पटेल, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, सभापती प्रेम वनवे, शिशीर वंजारी, कैलाश भगत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजकपूर राऊत, शाम पांडे, धनराज साठवणे, डॉ.ब्राम्हणकर, टेंभुर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.नाना पटोले म्हणाले, भाजपने फक्त आश्वासनांवर जनतेचा कौल मिळविला, मात्र जनतेला आश्वासनाऐवजी कुठलीच परतफेड केली नाही. दुष्काळ सुरु असताना उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा केला जायचा. मात्र आता भर पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सांगली, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यात पुराचे थैमान असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेत व्यस्त होते. भाजप शासनाच्या काळात बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना या असंवेदनशील सरकारने त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे कार्य केले आहे. पेट्रोल व डिझेलच्या माध्यमातून दर महिन्याला तीन हजार ५०० कोटी रुपयांची लुट सामान्य जनतेकडून केली जात आहे. शेतकरी कर्जमाफी ही केवळ फार्स ठरली आहे. गरीबांच्या पैशांची उधळपट्टी सर्रास केली जात असून ज्या योजना राबविल्या जात आहेत त्या काँग्रेस शासन काळातील आहेत. संविधान व लोकशाही व्यवस्था महत्वाची असताना भाजपचे खासदार मात्र शहीदांबद्दल अपमानकारक वक्तव्य करून जनभावना भडकावित आहेत. नोकरभरती बंद असून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही देण्यात आली नाही. ३७० कलम हटविण्यावर भाजपची भूमिका अजूनही स्पष्ट नाही. वीज व आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेसची नीती स्पष्ट असून मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याने याबाबत जो निर्णय घेतला आहे तोच निर्णय काँग्रेसही घेईल असा सुतोवाचही त्यांनी केला.तर प्रचाराची भूमिका महत्वाचीसाकोली विधानसभा क्षेत्रातून आपली उमेदवारी आहे काय? या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले, काँग्रेसच्या वरिष्ठांना याबाबत मी आपली भूमिका कळविली आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातून लढविण्यापेक्षा प्रचार कार्यात सहभागी होणे महत्वाचे आहे. हीच भूमिका महत्वाची असून काँग्रेसला बळकट करणे हेच माझे ध्येय असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले