लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा : तांदळाची वेळेत उचल न झाल्याने गोदाम रिकामे झाले नाही. परिणामी जिल्ह्यातील धानाची भरडाई रखडली. आता पावसाळ्याचे कारण पुढे करीत जिल्ह्यातील धान नागपूर आणि गोंदिया येथील राईस मिलर्सना भरडाईकरिता देण्याचा घाट घातला आहे. त्यासंदर्भात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठविले आहे. तांदूळ वेळेवर उचलला गेला असता तर गोदाम रिकामे झाले असते आणि जिल्ह्यातील मिलर्सनीच भरडाई केली असती. मात्र नियोजनाच्या अभावाने सध्या जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान पडून आहेत.भंडारा जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यापासून धान खरेदीला प्रारंभ झाला. तब्बल ३० लाख क्विंटलची खरेदी करण्यात आली. नियोजनाच्या अभावाने तांदळाची उचलच झाली नाही. तांदळाची उचल केली असती तर गोदाम रिकामे झाले असते आणि स्थानिक मिलर्सला भरडाई करणे शक्य झाले असते. सध्या जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. गोदम हाऊसफुल असल्याने उन्हाळी धानाची खरेदी प्रभावित झाली आहे.आता पावसाळ्याचे कारण पुढे करीत जिल्ह्यातील धान भरडाईसाठी नागपूर व गोंदिया जिल्ह्याला देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. १ जून रोजी जिल्हा धान भरडाई समितीची बैठक झाली. या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठविले. त्या पत्रात पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील आॅफर भरलेल्या मिलर्सला सीएमआर धान भरडाईचे काम देण्याबाबत आपल्या स्तरावरून निर्देश द्यावे असे म्हटले आहे.गोदाम हाऊसफुल्लजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान खरेदी होत असली तरी गोदामांचे नियोजन मात्र दिसत नाही. यावर्षी ३० लाख क्विंटल धान खरेदी झाल्यानंतर गोदाम हाऊसफुल्ल झाले. सुरुवातीपासूनच तांदळाची उचल करणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. अन्न व पुरवठा विभागाने आणि स्थानिक पणन कार्यालयाने दुर्लक्ष केले. परिणामी गोदाम रिकामे झाले नाही आणि भरडाईला धान देता आले नाही. वेळीच तांदूळ उचलला असता तर जिल्ह्यातील मिलर्सला भरडाई करणे शक्य झाले असते. त्यातून येथील कामगारांना रोजगार मिळाला असता. आता बाहेर जिल्ह्यात भरडाईसाठी धान देण्याचा प्रयत्न सुरु असल्याने जिल्ह्यातील १० हजार मजुरांवर उपासमारीचे संकट ओढविण्याची शक्यता आहे. आता २५ दिवसांच्या कालावधीत धान भरडाई कशी होणार हाही प्रश्न आहे. आधीच लॉकडाऊनने रोजगार हिरावला. आता यामुळे मजूर संकटात येणार आहेत.सहा महिन्याचा कालावधी लोटूनही राज्य शासनाने भरडाईसंदर्भात योग्य नियोजन केले नाही. आता प्रशासनाने भंडारा जिल्ह्यातील धान अन्य दुसºया जिल्ह्यात भरडाई करण्यास देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील हजारो मजुरांच्या हातचे काम हिरावले जाणार आहे. ही भरडाई जिल्ह्यातच व्हावी अशी मागणी आहे.-डॉ.परिणय फुके, आमदारभंडारा जिल्ह्यात १६६ मिलर्स आहेत. त्यांची दरदिवशी ५० हजार क्विंटल भरडाईची क्षमता आहे. जिल्ह्यात खरेदी झालेला ३० लाख क्विंटल धान ६६ दिवसात भरडाई करणे शक्य होते. परंतु आता २०० दिवस पूर्ण झाले तरी १० लाख क्विंटल धान शिल्लक आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षित धोरणाने ही वेळ आली आहे. जिल्ह्यातील धानाची जिल्ह्यातच भरडाई व्हावी अशी आमची भूमिका आहे. बाहेर जिल्ह्यात भरडाईसाठी धान दिल्यास आम्ही आंदोलन करू.-राजू कारेमोरे,आमदार तथा अध्यक्ष जिल्हा राईस मिलर्स असोसिएशन, भंडारा.
धान बाहेर जिल्ह्यात भरडाईस देण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 5:00 AM
भंडारा जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यापासून धान खरेदीला प्रारंभ झाला. तब्बल ३० लाख क्विंटलची खरेदी करण्यात आली. नियोजनाच्या अभावाने तांदळाची उचलच झाली नाही. तांदळाची उचल केली असती तर गोदाम रिकामे झाले असते आणि स्थानिक मिलर्सला भरडाई करणे शक्य झाले असते. सध्या जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. गोदम हाऊसफुल असल्याने उन्हाळी धानाची खरेदी प्रभावित झाली आहे.
ठळक मुद्देदहा लाख क्विंटल धान पडून, अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिवांना पाठविले पत्र