शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

निलंबित पडारेंच्या कपाटांचा पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:19 AM

प्रशांत देसाई ।आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील सहायक प्रशासन अधिकारी राजन पडारे हे निलंबनानंतर त्यांच्याकडील कपाटाच्या चाब्या न दिल्याने न्यायालयीन कामे प्रलंबित होती. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यां यांच्या आदेशानुसार मंगळवारला दुपारी पडारे यांच्या तीन कपाटांचे कुलूप तोडून पंचनामा करण्यात आला. या कारवाईने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.गारगोटी येथील प्रशिक्षणासाठी पडारे ...

ठळक मुद्देआरोग्य विभागातील प्रकार : सीईओंच्या आदेशानंतर कारवाई

प्रशांत देसाई ।आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील सहायक प्रशासन अधिकारी राजन पडारे हे निलंबनानंतर त्यांच्याकडील कपाटाच्या चाब्या न दिल्याने न्यायालयीन कामे प्रलंबित होती. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यां यांच्या आदेशानुसार मंगळवारला दुपारी पडारे यांच्या तीन कपाटांचे कुलूप तोडून पंचनामा करण्यात आला. या कारवाईने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.गारगोटी येथील प्रशिक्षणासाठी पडारे यांची निवड झाली होती. मात्र प्रशिक्षणाला जाणे त्यांनी टाळले. याप्रकरणी सीईओ मनोजकुमार सुर्यवंशी यांनी पडारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित केले. निलंबनानंतर पडारे यांची लाखांदूर पंचायत समितीला बदली करण्यात आली. निलंबन व बदलीचे आदेश पडारे यांना २४ नोव्हेंबरला बजावून त्यांना मध्यान्हानंतर आरोग्य विभागातून कार्यमुक्त केले. मात्र बदलीस्थळी न जाता पडारे यांनी त्यांच्याकडील शासकीय दस्ताऐवज असलेल्या तीन कपाटांच्या चाब्याही हस्तांतरीत केलेल्या नव्हत्या. पडारे यांच्याकडे न्यायालयीन प्रक्रियेचा कार्यभार होता. यामुळे न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यासाठी कपाटातील कागदपत्रे आवश्यक होते. ते मिळण्यासाठी आरोग्य विभागाने मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे मागणी केली. त्यावर सीईओ सुर्यवंशी यांनी पडारे यांच्या ताब्यातील कपाटाचे कुलूप तोडून पंचनामा करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाºयांना दिले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एम. मोटघरे, प्रशासन अधिकारी एम.डी. केवट, कनिष्ठ प्रशासन अधिकारी आर.बी. मडकाम, अवैद्यकीय पर्यवेक्षक एम.टी. श्रीनाथ, कनिष्ठ सहायक ए.ए. मशीदकर, कनिष्ठ सहायक लेखा ए.एम. तिडके यांच्या समक्ष पंचनामा केला.पहिलीच कारवाईएखादा कर्मचारी एखाद्या प्रकरणात निलंबित झाल्यास त्याच्याकडील अधिकार काढून त्याचा प्रभार अन्य कर्मचाºयाकडे सोपविण्यात येतो. मात्र पडारे यांनी निलंबनानंतर प्रभार व कपाटाच्या चाब्या दुसऱ्यांकडे सोपविल्या नाही. त्यामुळे पंचनामा करून कपाटाचे कुलूप तोडावे लागल्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवली. जिल्हा परिषद प्रशासनात अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच करण्यात आली. या कारवाईची आज दिवसभर कर्मचाºयांमध्ये चर्चा होती.तीन कपाटांचा पंचनामामंगळवारला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पडारे यांच्या ताब्यातील तीन कपाटाचे कुलूप तोडण्यात आले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. पडारे यांच्या एकाच कपाटातील ७० फाईल्सची माहिती तपासून त्याची नोंद करण्यात आली.निलंबनाबाबत चुकीचे अपीलमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केल्यानंतर पडारे यांनी आयुक्तांकडे दाद न मागता लाखांदूर येथे केलेल्या बदली प्रकरणी न्यायालयात दाद मागितली. हा प्रकार जिल्हा परिषद अधिनियमाचा भंग करणारा आहे. पडारे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.मुख्यद्वाराचे कुलूप बदललेपडारे यांच्याकडून आरोग्य विभागात बकुठलाही उपदव्याप होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने कक्षाच्या प्रवेशद्वाराचे जुने कुलूप बदलवून पडारे यांच्या कक्षाच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला आहे.