तुमसर तालुक्यातील माडगी येथील ३३ व ११ के.व्ही उपकेंद्राच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता बंडू वासनिक, अधिक्षक अभियंता भंडारा राजेश नाईक, भंडारा महावितरणचे कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड, माडगीचे संरपंच गौरीशंकर पंचबुधे, प्रेमसागर गणविर तसेच पदाधिकारी व महावितरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ना. नितीन राऊत म्हणाले, भंडारा व गोंदिया हे जिल्हे मानव विकास निर्देशांकामध्ये मागे पडलेले आहेत. या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबध्द आहे. मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे अनेक विकास कामे मंदावली आहेत. या काळातही अनेक दिवसांपासून माडगी परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेता महावितरण विभागाच्या वतीने माडगी येथे उपकेंद्र निर्मिती झाली आहे.
प्रास्ताविक महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी केले. संचालन स्वाती फटे व रेशमा नंदनवार यांनी, तर आभार प्रदर्शन महावितरणचे कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड यांनी केले.
बॉक्स
कृषी पंपासाठी एक वेगळा फिडर उपलब्ध
माडगी उपकेंद्रामुळे जवळपासच्या १० गावातील एक हजार शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी व औद्योगिक तसेच इतर चार हजार ग्राहकांना गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा मिळण्यास मदत होईल. यामध्ये कृषी पंपासाठी एक वेगळा फिडर उपलब्ध करुन दिल्याने शेतकऱ्यांना नियमित व गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा उपलब्ध होईल. शेती व उद्योगाच्या विकासातून गावाचा विकास होतो. नव्या उद्योगांसाठी गांभीर्याने लक्ष घालून माडगी येथील उपकेंद्रात तीन फिडर दिलेले आहेत. माडगी येथील उपकेंद्राच्या माध्यामातून आपली विकासाची वाटचाल चालू राहील, असे ना. राऊत सांगितले.