शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

झाडीपट्टीचा नायक-खलनायक रविंद्र ठवकर

By admin | Published: September 22, 2015 1:04 AM

गणेशोत्सव, दिवाळी, नववर्षाच्या पर्वावर हौसेखातर सर्वोदय नाट्यमंडळाच्या रंगभूमीवर नाटके सादरीकरण करणारा पालोरा येथील

युवराज गोमासे ल्ल करडी (पालोरा)गणेशोत्सव, दिवाळी, नववर्षाच्या पर्वावर हौसेखातर सर्वोदय नाट्यमंडळाच्या रंगभूमीवर नाटके सादरीकरण करणारा पालोरा येथील रविंद्र ठवकर यांचे नाव नाट्यक्षेत्रात आज झाडीपट्टीचा नायक म्हणून आदराने घेतले जाते. ३० वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक चढ उतार त्यांनी अनुभवले. गरीबीमुळे पोटापाण्यासाठी अनेक व्यवसायांचे उपद्व्याप सुरु केल्यानंतरही त्यांची नाटकांची ओढ कमी झाली नाही. सशक्त अभिनय, दमदार संवाद व उत्कृष्ट देहबोलीच्या भरवशावर नाट्यरसिकांची दाद मिळविली. अनेक पुरस्कार व पारितोषिकांचे ते मानकरी ठरले आहेत. पालोरा येथील सर्वोदय नाट्य मंडळाच्या रंगभूमीवर तयार झालेल्या रविंद्र तुळशीराम ठवकर या ४७ वर्षीय नाट्य कलावंताचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले. घरी दोन एकर जमीन, दोन भाऊ, प्रपंचाचा गाडा निट चालावा म्हणून सुरुवातीला मजुरी, देव्हाडा वैनगंगा साखर कारखान्यात पहारेदाराची नोकरी केली. कारखाना बंद झाल्यानंतर टेलरिंग व दुधाचा व्यवसाय आज ते सांभाळत आहेत.सन १९७२ मध्ये ‘बोवा तिथे बाया’ या नाटकात त्यांनी बालकलाकाराची भूमिका वठविली. नाटकातील गंध वाढत गेला. तरुण वयातील ‘फकीरा’ ही पहिली नाटक गाजली. अन् नायक म्हणून त्यांचा उदय झाला. त्यानंतर सर्व नाटकात खलनायक व नायकाचीच भूमिका त्यांना मिळाली. त्यांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये यळकोट मल्हार, मराठा गडी - यशाचा धनी, ईथ ओसाळला मृत्यू, संभा बेलदार, भीक, भाकर, भूक, रुसली साडी माहेरची, खंडोबाची आण, सिंहाचा छावा, काकाचा अघोरी कावा, तो मी नव्हेच आदी व अन्य नाटकांचा समावेश आहे. आतापर्यंत त्यांनी २५१ नाटके खेळली. खलनायकाचीही पात्रे रंगविली. व्यावसायीक रंगभूमीत सन १९९६ मध्ये प्रवेश झाला. ‘सासू नंबरी-सून दस नंबरी’ ही त्यांची पहिली व्यावसायीक नाटक प्रेक्षकांनी खऱ्या अर्थाने गाजविली. पसंतीस उतरली, भंडारा जिल्ह्यात नाव झाला. सरगम नाट्य रंगभूमीमुळे आघाडीचा नाट्यकलावंत म्हणून ओळख मिळाली. भंडारा सरगम रंगभूमी व कामगार कल्याण मंडळ तुमसर यांचेमुळे नागपूर विभागीय स्तरावर अनेक नाटके खेळता आली, असे ठवकर आदराने सांगतात.पारितोषिके प्रोत्साहन व चालना४पालोरा सारख्या दुर्गम खेड्यातून समोर आलेल्या रविंद्र ठवकर यांनी सरगम नाट्य रंगभूमी व सर्वस्तरीय कलाकार परिषदेची स्थापना होण्यासाठी मोलाची मदत केली, ते संस्थापक सदस्य आहेत. नवनवीन कलाकारांना चालना देणे, मंच मिळवून देण्यासोबत प्रशिक्षणाचे काम पार पाडल्या जात आहेत. समाजकल्याण विभागाद्वारे संचालित कामगार कल्याण मंडळाद्वारे खेळल्या गेलेल्या ‘मनधुंवाधार’ या नाटकासाठी कामगार कल्याण मंडळाचा पुरस्कार मिळाला. कलाकार परिषदेतर्फेही उत्कृष्ट कलाकार म्हणून अनेकदा सन्मानित करण्यात आले. खेड्यातील कलावंतांना संदेश४गाव, खेड्यातील नाट्य कलावंतांनी मेहनत केली पाहिजे. मार्गदर्शनातून मनुष्य पुढे जातो. कलेची सर्वत्र प्रसंशा होते. झाडीपट्टीतील कलावंतांनी गावातील स्टेजवर अवलंबून न राहता व्यवसायीक रंगभूमीकडे वळावे किंवा हौशी रंगभूमीला तरी जोपासले पाहिजे. कला प्रत्येकाच्या अंगी असून ती योग्य स्तरावर प्रदर्शीत झाली पाहिजे, असा संदेश रविंद्र ठवकर यांचा आहे.