छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून नेफडो साकोली तालुका अध्यक्षा प्रीती डोंगरवार व उपाध्यक्षा कल्पना सांगोडे या नवयुक्त पदाधिकारी यांचा पुष्पगुच्छ व वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. प्रोफेसर बहेकार यांनी नेफडो संस्थेचे उद्देश व वृक्षारोपण करणे पर्यावरणासाठी किती महत्त्वाचे आहे पटवून दिले. भंडारा जिल्हाध्यक्ष यशवंत उपरीकर यांनी अंधश्रद्धा, अत्याचार, बालमजुरी, गडकिल्ले यांचे जतन, आदी विविध विषयांवर मानवता विकासबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे साकोली तालुका अध्यक्षा प्रीती डोंगरवार, तालुका उपाध्यक्षा कल्पना सांगोडे, महिला अध्यक्षा अनिता खोटेले, महिला उपाध्यक्षा वनिता बहेकार, अंनिस तालुका अध्यक्ष के. एस. रंगारी, महिला सचिव हेमलता उपरीकर, युगल हेमने, पूर्वा बहेकार, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
माणिक खर्डेकर लोकमत वार्ताहर सासरा
130821\1444-img-20210813-wa0011.jpg
वृक्षारोपण