शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

शेततळ्याच्या पाण्यावर केली रोवणी

By admin | Published: May 26, 2016 1:34 AM

मागील वर्षी मान्सूनला उशिरा सुरूवात झाल्यानंतर पावसाने तब्बल महिनाभर दडी मारली. रोवणीची वेळ आली तरी पावसाचा पत्ता नव्हता.

लोकमत जलमित्र अभियान : जलयुक्त शिवारातून जलक्रांतीभंडारा : मागील वर्षी मान्सूनला उशिरा सुरूवात झाल्यानंतर पावसाने तब्बल महिनाभर दडी मारली. रोवणीची वेळ आली तरी पावसाचा पत्ता नव्हता. अशावेळी जलयुक्त शिवारमध्ये केलेल्या आणि पहिल्याच पावसाने भरलेल्या शेततळयातील पाणी कामी आले. तळयातील पाण्याचा उपयोग करून रोवणी तर केलीच पण पाण्यामुळे माझे पीक वाचले व दुबार रोवणीची वेळ माझ्यावर आली नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया सितासावंगी गावातील सोमा गाढवे या शेतकऱ्याने व्यक्त केली. भंडारा जिल्ह्यात आजघडीला पाणीटंचाई दिसून येत नसली, तरी ग्रामीण भागात पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. दरवर्षी मुबलक पाऊस होतो. मात्र त्या पाण्याचे योग्य पुनर्भरण होत नाही. ते सर्व पाणी नदी-नाल्यांमधून वाहून जाते. या पाण्याचे जतन व्हावे, यासाठी जनजागृती करण्यासाठी ‘लोकमत’ने जलमित्र अभियान सुरू केले आहे. भंडारा हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. तुमसर तालुक्याच्या सीतासावंगी या गावातील शेतकरी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर शेती करतात. भंडारा जिल्ह्यात भरपूर पाऊस पडत असल्यामुळे येथील शेतकरी धान हे मुख्य पीक घेतात. मात्र पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांना अनेकदा भाताचे पीक घेणेही शक्य होत नाही. या गावातील सोमा गाढवे यांची दोन एकर शेती आहे. कोरडवाहू शेती असल्यामुळे भात व तुर पीक ते घेतात. मात्र एखाद्यावर्षी पाऊस उशिरा आला किंवा कमी झाला तर भाताचे पीक हातचे जात असल्याचे गाढवे यांनी सांगितले.जलयुक्त शिवार योजनेमधून गाढवे यांच्या शेतात २५ बाय २० बाय ७ मीटर या आकाराचे शेततळे खोदण्यात आले. पहिल्याच पावसात शेततळे भरले. पावसाला सुरूवात झाल्यामुळे गाढवे यांनी भात नर्सरी तयार केली. मात्र पावसाने महिनाभर दडी मारली. पावसाअभावी अन्य शेतकऱ्यांची नर्सरी करपत असताना गाढवे यांनी शेततळयातील पाण्यावर नर्सरी वाचवली आणि पाण्याचा उपयोग चिखलणीसाठी करून धानाची रोवणी केली. ज्यावेळी धानाला पाण्याची गरज होती आणि पाऊस आला नाही त्यावेळी शेततळयातील पाणी देऊन त्यांना पीक वाचवता आले. शेततळयामुळे एका पाण्याअभावी पीक जाण्याची भीती आता राहिली नाही. शेततळयात उन्हाळ्यापर्यंत पाणी राहिले तर, भाजीपाला लागवड करण्याचा मानस गाढवे यांनी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)