लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बांबू हा कल्पवृक्ष आहे. त्याचे विविध उपयोग प्राचीन काळापासून केले जाते. परंतु अलिकडे प्लास्टिकचा वापर वाढला आणि बांबूच्या वस्तूकडे दुर्लक्ष होऊ लागले. मात्र पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिक उत्पादनाला बांबूचे उत्पादन पर्याय होऊ शकते. गृहनिर्माणापासून ते विविध उपयोगी वस्तू या बांबूपासून तयार केल्या जातात. स्थानिक लोकांमध्ये कौशल्य विकसीत करण्याची गरज असून भंडारा जिल्ह्यात बांबूवर आधारित लघू उद्योगाला मोठी संधी आहे, असे मेळघाटच्या संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.भंडारा येथे लोकमंगल समूहाच्या वतीने बांबू प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त सुनील देशपांडे येथे आले असता त्यांनी बांबू या विषयावर माहिती दिली. करंगळीच्या आकारापासून ते एक फुट व्यास असलेले बांबू देशात सर्वत्र उपलब्ध आहेत. सहा फुट ते १०० फूट उंचीेचे बांबू पहावयास मिळतात. भारतात भौगोलीक विविधता असल्याने क्षेत्र निहाय बांबूच्या जाती बदलतात. देशात तब्बल १३६ जातींचे बांबू असून एकट्या अरुणाचल प्रदेश मध्ये ५२ जातीचे बांबू पहायला मिळतात. बांबूच बन एकवेळ लावले तर त्यापासून १२० वर्ष उत्पादन मिळते असे सुनील देशपांडे यांनी सांगितले.जन्मापासून ते मृत्यूपर्यंत बांबूची साथ असते. पूर्वी बाळाचा जन्म झाल्यानंतर नाळ कापण्यासाठी बांबूचा चाकू वापरला जायचा. तर अंतयात्रेतील तिरडीही बांबूचीच असते. पूर्वीच्या काळात अनेक गृहोपयोगी वस्तू बांबूपासून तयार केल्या जायच्या. बांबूचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व होते. परंतु अलिकडे प्लास्टिकचा वापर वाढला आणि बांबू अडगळीत पडला. कल्पवृक्ष असलेल्या या बांबूपासून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून केला जात आहे. आतापर्यंत मेळघाटसह विविध भागातील दहा हजार लोकांना बांबू उत्पादनासाठी प्रशिक्षित करण्यात आले. २० केंद्र देशात उभारण्यात आले आहेत. बांबूपासून अलंकार, शिल्प आणि गृहनिर्माण अशी तिहेरी उत्पादन घेतली जात आहेत. आम्ही तयार केलेल्या बांबूच्या राखीला देशभर मोठी मागणी आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात बांबूमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. रोजगारासोबतच पर्यावरणाचा ºहासही टाळता येतो असे त्यांनी सांगितले.भंडारा येथे दोन दिवसीय बांबू प्रदर्शन आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीवर विविध विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. लोकमंगल समूहाचे अध्यक्ष अनिल मेंढे यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा साकारली असून भंडारा जिल्ह्यात बांबूपासून उत्पादने तयार करण्याचा प्रकल्प लवकरच साकारला जाणार आहे.ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी धडपडअमरावती जिल्ह्यातील मेळघाटात संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक अध्यक्ष सुनील देशपांडे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी धडपडत आहेत. समाजकार्य विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेले देशपांडे यांची विणू काळे यांच्यासोबत भेट झाली आणि बांबूशी त्यांचा घनिष्ट संबंध आला. चित्रकुट ग्रामोदय विश्वविद्यालयात ते बांबू विभागाचे विभागप्रमुख होते. १६ जून १९९५ पासून ते मेळघाटमध्ये राहावयास गेले. डॉ.रवींद्र कोल्हे यांच्या सहकार्याने संपूर्ण बांबू केंद्राची त्यांनी स्थापना केली.
प्लास्टिकला बांबू उत्पादन पर्याय होऊ शकतोे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 6:00 AM
भंडारा येथे लोकमंगल समूहाच्या वतीने बांबू प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त सुनील देशपांडे येथे आले असता त्यांनी बांबू या विषयावर माहिती दिली. करंगळीच्या आकारापासून ते एक फुट व्यास असलेले बांबू देशात सर्वत्र उपलब्ध आहेत. सहा फुट ते १०० फूट उंचीेचे बांबू पहावयास मिळतात. भारतात भौगोलीक विविधता असल्याने क्षेत्र निहाय बांबूच्या जाती बदलतात.
ठळक मुद्देसुनील देशपांडे यांची माहिती : जिल्ह्यात बांबूवर आधारित लघु उद्योगासाठी मोठी संधी