आॅनलाईन लोकमतभंडारा : काही दिवसापासून उघडया हागणदारीच्या जागा स्वच्छ करून शाश्वत स्वच्छता व प्लॉस्टीक बंदीसाठी ग्राम पंचायतने पाउले उचलले असताना २६ जानेवारीला घेण्यात आलेल्या ग्राम सभेमध्ये या ऐतिहासीक निर्णयाने स्वागत करून प्लॉस्टीक बंदीचा ठराव एकमताने पारीत करण्यात आला.लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. ग्राम पंचायतीमध्ये हा ऐतिहासीक निर्णय ग्रामसभेत नागरीक, व्यावसायीकांनी घेतला आहे. उल्लेखनीय म्हणजे यावेळी ग्रामसेवक संघटनांचा २६ जानेवारीच्या ग्रामसभा घेण्यावर बहिष्कार होता, अशातही विरली बुज मध्ये ग्राम पंचायतीने पुढाकार घेत ग्रामसभा घेवून प्लॉस्टीक बंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर अंमलबजावणी साठी नागरिकांनी प्लॉस्टीक बंदीची शपथ घेतली व यापुढे प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संकल्प केला आहे.सन २०१६-१७ मध्ये विरली बुज. गाव हागणदारीमुक्त झाल्यानंतरही मासळ मार्गाकडे जाणा-या गावात लगतची जागा अस्वच्छ होती. खताचे खडडे, घनकचरा त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. बहुतांश कुटूंब त्या जागेवर हागणदारीसाठी जात होते. अखेर ग्राम पंचायतचे सरपंच लोकेश भेंडारकर, उपसरपंच मिलींद सिव्हंगडे व सचिव विरूडकर व ग्राम पंचायत पदाधिका-यांनी तिन्ही जागा स्वच्छ सुंदर करण्याचा निर्धार केला. सर्वात पहिले मासळकडे मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या हागणदारीच्या जागेची स्वच्छता करण्यात आली. रस्त्याच्या कडेचे मांसमटनचे दुकाने इतरत्र हलविण्यात आली. त्यातून होणारी घाण थांबविण्यात आली. खताचे खडडे हटविण्यात आले. त्या ठिकाणी वृक्ष लागवड, नेटचे जाळे, बसण्यासाठी खुर्च्यां व विद्युतची व्यवस्था करण्यात आली. तब्बल दीड महिन्यापासून गावात करण्यात आलेल्या स्वच्छते दरम्यान प्लास्टिक कचरा हा मोठ्या प्रमाणात आढळून आला. घरात पिशव्यांचा वापर, किराणा, पानठेला, हॉटेल व अन्य व्यवसायाच्या ठिकाणावरून निघणाºया प्लास्टिकमुळे मानवी आरोग्य व पर्यावरण धोक्यात आले आहे. वेगवेगळ्या मागार्ने शेतजमिनीत जाणाºया प्लास्टिकमुळे जमिनीची सुपिकता नष्ट होत आहे.व्यावसायिकांना कचराकुड्यांचे वितरणलाखांदूर तालुक्यातील विरली बुज ग्राम पंचायत ही लाखांदूर व पवनी या मुख्य मार्गावर मध्यवर्ती ठिकाणी वसलेले आहे. बाजारपेठ असल्याने या परिसरातील अनेक गावांचा संपर्क आहे. गावात हॉटेल,पानठेले,किराणा व विविध प्रकारचे व्यवसाय आहे. त्यामुळे विरली बुज ग्राम पंचायतीच्या वतीने कचरा कुड्यांचे वितरण करण्यात आले. सरपंच लोकेश भेंडारकर, उपसरपंच मिलींद सिव्हंगडे व पदाधिकारी यांचे वतीने वितरण करण्यात आले.
विरलीच्या ग्रामसभेत प्लास्टीकबंदीचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:24 PM
काही दिवसापासून उघडया हागणदारीच्या जागा स्वच्छ करून शाश्वत स्वच्छता व प्लॉस्टीक बंदीसाठी ग्राम पंचायतने पाउले उचलले असताना २६ जानेवारीला घेण्यात आलेल्या ग्राम सभेमध्ये या ऐतिहासीक निर्णयाने स्वागत करून प्लॉस्टीक बंदीचा ठराव एकमताने पारीत करण्यात आला.
ठळक मुद्देग्रामसभेला गर्दी : नागरिकांनी घेतली प्लास्टीक बंदीची शपथ