उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन: साकोली तालुका काँगे्रस कमेटीची मागणीसाकोली : निसर्गाचा लहरीपणा व सततची नापिकी यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनाने शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, असे निवेदन साकोली तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी साकोली यांना देण्यात आले आहे.या निवेदनानुसार शसनाने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावे, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांचे विज बिल माफ करण्यात यावे, कृषी पंपासाठी विद्युत जोडणी देण्यात यावी, तालुक्यातील विद्यार्थ्यांचे उच्च व तांत्रिक शिक्षण शुल्क माफ करण्यात यावे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे देयके त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतानी तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, रेखा समरीत, माजी सभापती ब्रिजलाल समरीत, जगन रहांगडाले, प्रकाश करंजेकर, ओम गायकवाड, सुनिता शहारे, विष्णू पुस्तोडे, अश्विन नशीने, जितेंद्र नशीने, मनोहर डोंगरे, कपील मल्लानी, उमेश भुरे, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, दिपक रामटेके, ताराबाई तरजुले, विजय दुबे, ओमप्रकाश बनकर, अमीत राऊत, कुलदीप नंदेश्वर, सुशील बनकर, शालु नंदेश्वर, जिल्हा परिषद सदस्य मंदा गणवीर, निनाद राऊत उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करा
By admin | Published: October 09, 2015 1:13 AM