शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

हिवरा-हत्तीडोई पांदण रस्त्याची दुर्दशा

By admin | Published: March 31, 2016 12:58 AM

नागरिकांची गैरसोय : प्रशासन लक्ष देणार काय?

भंडारा : येथून १५ कि़मी. अंतरावर हत्तीडोई मोहदुरा नावाचे गाव असून हे गाव नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील गाव आहे. हत्तीडोईला लागून नागपूर जिल्ह्यात हिवरा आदी गावे असून येथील शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी हिवरा-अदासा-हत्तीडोईमार्गे मोहदुरा शाळेत जातात. परंतु ज्या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या पांदण रस्त्याने हे विद्यार्थी जाणे येणे करतात. त्या पांदण रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून विद्यार्थ्यांसह नागरिकांना या पांदण रस्त्यावरून जाणे येणे कठीण झाले आहे.त्या गावात ग्रामपंचायत कार्यालय असून येथे हिरवी मिरचीची मोठी बाजारपेठ असून येथील हिरवी मिरची ट्रकद्वारे देशाची राजधानी दिल्ली येथे पाठविण्यात येते. एकंदरीत हत्तीडोई परिसरात हिरव्या मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. परिणामी शेतात जाण्यासाठी रहदारी मोठ्या प्रमाणात असते.हिवरा-हत्तीडोई पांदण रस्ता जवळपास दोन कि.मी. अंतराचा असून मागील कित्येक वर्षापासून या रस्त्याचा काम रखडला आहे.लोकप्रतिनिधी व शासनाच्या उदासीन धोरणामुळे या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून शालेय विद्यार्थ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. भंडारा तालुक्यातील मोहदुरा येथे इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षणाची सोय असून हिवरा-अदासा-हत्तीडोई मार्गे मोहदुरा येथे शालेय विद्यार्थी जाणे येणे करतात. या दोन जिल्ह्यांना जोडणारा दुसरा एक नहराचा रस्ता असून त्यांचा अंतर जवळपास ८ ते १० कि़मी. आहे आणि पांदण रस्त्याचा अंतर दोन कि़मी. अंतराचा आहे. म्हणजेच दोन कि़मी. साठी शालेय विद्यार्थ्यांना जवळपास ८ ते १० कि़लोमीटरची कसरत करावी लागत आहे. यासंदर्भात हत्तीडोई ग्रामपंचायतने या विषयी ठराव मंजुर करून हा पांदण रस्ता आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत तयार करण्यात, अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे. (प्रतिनिधी)