शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

दहा लाख थकविल्याने रचला लुटमारीचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:37 AM

साकोली : धान व्यापारी रमेश अण्णा याने ट्रक भाड्याचे १० लाख रुपये थकविल्याने लुटमारीचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न ...

साकोली : धान व्यापारी रमेश अण्णा याने ट्रक भाड्याचे १० लाख रुपये थकविल्याने लुटमारीचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. साकोली तालुक्यातील पळसगाव-गोंडउमरी मार्गावर मंगळवारी रात्री झालेल्या लुटमारीतील सर्व आरोपी जेरबंद झाले असून या घटनेचा मास्टरमाइंड रामदास भिरकड हा पाच ट्रकचा मालक आहे. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून उर्वरित सात जणांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

साकोली तालुक्यातील पळसगाव-गोंडउमरी मार्गावर धान व्यापाऱ्याचा दिवाणजी माशेट्टी श्रीनिवास भास्कर याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूच्या धाकावर २२ लाख ५९ हजार रुपये रोख लुटण्यात आले होते. एवढ्या मोठ्या लुटमारीची घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा तपास भंडारा स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण व त्यांच्या पथकाने अवघ्या २४ तासात सर्वच्या सर्व आठ आरोपींना जेरबंद करून संपूर्ण रक्कमही हस्तगत केली.

रामदास भिरकड हा नागपूर येथील रहिवासी असून हैद्राबादवरून भंडारा-गोंदिया जिल्ह्यात तांदूळ आणण्याचे काम करीत होता. त्याच्याकडे पाच ट्रक असून १० लाख रुपये रमेश अण्णाने थकविल्याने हा कट रचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यासाठी त्याने आपल्या सहकाऱ्यांची मदत घेतली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी वायकर यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, साकोलीचे ठाणेदार जितेंद्र बोरकर व त्यांच्या पथकाने केली.

असा लागला छडा

दिवाणजीच्या सांगण्यानुसार घटनास्थळावर मोटारसायकल पडलेली होती. त्या बाजूला एक इसम झोपून होता. तेथून कार सहज निघून जाईल, अशी जागाही होती. परंतु चालकाने कार थांबविली. दोघेही खाली उतरले. तेव्हा दबा धरून बसलेले सात जण धावून आले. त्यांनी केवळ दिवाणजीच्याच डोळ्यात मिरची पावडर फेकली. चालकाला कोणतीही इजा केली नाही. यावरून पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसी हिसका दाखविताच पोपटासारखा बोलू लागला.

साळ्याच्या घरी रक्कम

लुटमार केल्यानंतर आरोपी रामदासने संपूर्ण २२ लाख ६९ हजारांची रक्कम आपला साळा चेतन शिवणकर याच्या धर्मापुरी येथील घरी ठेवली होती. पोलिसांनी ती हस्तगत केली.