शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
2
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
4
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
5
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
6
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
7
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
8
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
9
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
10
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
11
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
12
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
13
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
15
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
16
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
17
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
18
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
19
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
20
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर

पोक्सोच्या आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन; जनतेत प्रचंड रोष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 2:00 PM

Bhandara : वैनगंगा विद्यालय पवनीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क सावरला : दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना व्हॉट्सअॅपवर वाईट हेतूने मॅसेज पाठविल्याप्रकरणी वैनगंगा विद्यालय पवनी येथील भोजराज दिघोरे नावाच्या शिक्षकावर पोलिसात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्याला न्यायालयीन कोठडीही झाली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी जमानतीवर सुटका केल्याने पवनीकर जनतेत प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.

पवनीतील सामाजिक कार्यकर्ते हरीश तलमले, मयूर रेवतकर, मनोहर मेश्राम यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान असला तरी महिला व विद्यार्थी पालकांत प्रचंड रोष व्यक्त होत आहे. 

ऑगस्ट महिन्यात एका अज्ञात मुलीच्या पालकाने शिक्षकाविरोधात तक्रार केली होती. याकडे शाळा प्रशासनाने पूर्णतः कानाडोळा केल्याने भोजराज दिघोरे या शिक्षकाची हिंमत वाढली. परिणामी दहाव्या वर्गातील दोन विद्यार्थिनींचा मानसिक छळ झाला. 

एसएससी बोर्डात आपले संबंध असल्याचा बनाव करून विद्यार्थिनींना आपलेसे करण्याचा प्रयत्न झाला. असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून शाळा प्रशासनाने दक्ष राहावे, अशी मागणी पत्रकार परिषदेतून हरीश तलमले, मयूर रेवतकर, मनोहर मेश्राम यांनी केली आहे. 

शिक्षकाचे निलंबन दरम्यान, वैनगंगा शिक्षण संस्थेने या घटनेची दखल घेत भोजराज दिघोरे या शिक्षकाला निलंबित केले आहे. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने सभा बोलावली व अटक झालेल्या शिक्षकांच्या निलंबनाचा ठराव मंजूर करून घेतला. हा अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयाला पाठविला आहे.

तर पुन्हा मासे लागू शकतात गळाला ! आता भोजराज दिघोरे नावाचा शिक्षक आरोपी म्हणून पुढे आला. परंतु याआधी अज्ञात मुलीच्या पालकाने ऑगस्ट महिन्यात एका शिक्षकाविरोधात मुख्याध्यापकाकडे तक्रार केली होती. मात्र याकडे वैनगंगा शाळा प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले होते. सदर प्रकरण सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने उघडकीस आल्याने एका मागून एक प्रकरणे पुढे येत आहेत. पोलिस, शिक्षण विभाग आणि शाळा व्यवस्थापनाने कुणालाही पाठीशी न घालता कठोर कारवाई करून लागलेली कीड समूळ नष्ट करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. 

टॅग्स :bhandara-acभंडाराCrime Newsगुन्हेगारी