शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

जीवनानुभवाच्या शाळेतच लिहिली कविता

By admin | Published: October 06, 2016 12:52 AM

बालवयातच विवाह, शिक्षण साहित्य आणि संस्कृती यांचा दुरावा अशा विपरीत सामाजिक स्थितीतच माझ्या सासरच्यांनी मला शिकविले.

अंजनाबाई खुणे यांचे प्रतिपादन : कवी आणि कविता विशेष उपक्रमभंडारा : बालवयातच विवाह, शिक्षण साहित्य आणि संस्कृती यांचा दुरावा अशा विपरीत सामाजिक स्थितीतच माझ्या सासरच्यांनी मला शिकविले. जीवनातील अनुभवांची आणि शाळेतील अक्षरांची मैत्री जुळत गेली यातून माझी कविता प्रकटली. अशा शब्दात झाडीबोलीतील अग्रगण्ण कवचित्री अंजनाबाई खुणे यांनी आपल्या काव्य निर्मितीचे अंतरंग प्रकट केले.युगसंवाद भंडारा आणि शिवप्रसाद सदानंद जायस्वाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मोरगाव अर्जुनी यांच्या वतीने कवी आणि कविता या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झाडीबोली चळवळीचे प्रवर्तक डॉ. हरिश्चंद्र बोरकर हे होते. याप्रसंगी निमंत्रित कवयित्री अंजनाबाई खुणे, श्रीराम खुणे यांचा शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह देवून डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बोलीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा प्राचार्य गुरूप्रसाद पाखमोडे, डॉ. अनिल नितनवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कवयित्री अंजनाबाई खुणे यांची मुलाखत प्रा. श्रीकांत नाकाडे यांनी घेतली. अंजनाताईच्या जीवनातील विविध पैलू श्रोत्यांसमोर उलगडले. अंजनाबाई खुणे यांनी त्यांच्या उत्कृष्ट कवितांचे वाचन केले. त्यांच्या काव्यावर आस्वादक प्रतिक्रिया प्रा. संजय निंबेकर, हिरामण लांजे यांनी व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणातून डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी बोलीभाषेचे महत्व अधोरेखांकित करून अंजनाबाईची कविता ही नैसर्गीक सौंदर्याने बहरलेली असल्याने या कवितांचे महत्व अनन्यसाधारण आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्राणांची आहुती देणारे सैनिक तसेच कवी भगवान भोईदर, शंकर बढे, निलेश पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संचालन प्रा. शरद मेश्राम यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य गुरूप्रसाद पाखमोडे यांनी केले. आभार प्रा. नरेश आंबिलकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)