आॅनलाईन लोकमततुमसर : पाच चिमुकल्या मुलांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. प्राथमिक आरोग्य केंद्र लेंडेझरी येथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना तुमसर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही घटना तुमसर तालुक्यातील आलेसूर येथे रविवारी सायंकाळी ६ वाजता घडली.आलेसूर येथे दिनेश खोब्रागडे यांच्या घरच्या परसबागेत चंद्रज्योतीचे झाड आहे. सध्या या झाडाला बिया लागल्या आहेत. मुलांनी या बिया खाल्याने काही वेळेतच पाचही मुलांची प्रकृती बिघडली. यात रितेश विखेश खोब्रागडे (८), वैष्णवी अशोक नरकंडे, कावेरी अशोक नरकंडे (५), मयुरी अशोक नरकंडे (८) आरुषी राजू मेने (६) यांचा समावेश आहे. लेंडेझरी प्राथमिक आरोग्य केंद्रात या मुलांना उपचाराकरिता नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतरही त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे डॉक्टरांनी तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले. उपजिल्हा रुग्णालयात त्यांची प्रकृती स्थिर आहे. असे डॉक्टरांनी सांगितले. चंद्रज्योतीच्या बिया खाल्याची घटना यापूर्वी घडल्या आहेत.
चंद्रज्योतीच्या बियांमुळे विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 11:09 PM
पाच चिमुकल्या मुलांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. प्राथमिक आरोग्य केंद्र लेंडेझरी येथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना तुमसर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
ठळक मुद्देआलेसूर येथील घटना : पाच मुलांवर तुमसरात उपचार सुरु