मोहन भोयर ।आॅनलाईन लोकमततुमसर : तुमसर तालुक्यातील घानोड (सक्करधरा) रेतीघाटावर नियमबाह्य पोकलँड मशीनने सर्रास रेतीचे उत्खननसुरु आहे. महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने हा प्रकार येथे सुरु झाला आहे. महसूल प्रशासनाने हा रेती घाट येथे नुकताच लिलाव केला आहे. ट्रॅक्टरने रेती डंपींग करून काठावर टाकण्यात येते. तेथून ट्रकने रेती वाहतूक केली जात आहे. नदीपात्रात यंत्राने रेती उत्खनन करणे बंदी आहे हे विशेष.तुमसर तालुक्यातील घानोड (सक्करधरा) येथे बावनथडी नदी आहे. राज्य शासनाच्या महसूल विभागाने येथील घाट लिलाव केला आहे. येथील नदीपात्रातून पोकलँड मशीनने सर्रास रेतीचे उत्खनन सुरु आहे. दररोज नदी पात्रात सुमारे ५० ट्रॅक्टरने रेती भरून नदी काठावर नेण्यात येते. नदीकाठावर रेती डम्प केली जात आहे. डम्प रेती नंतर ट्रकमध्ये दुसºया मशीनने भरली जाते. हा गोरखधंदा येथे सर्रास सुरु आहे. आठ दिवसापूर्वी हा नदीघाट सुरु झाला आहे. महसूल अधिकाºयांच्या आशीर्वादाने ही नियमबाह्य कामे येथे सर्रास सुरु आहेत. सोमवारपासून ट्रकमधून रेती वाहतूक येथे सुरु झाली आहे. तत्पूर्वी आठ दिवसापासून रेती डम्प करणे येथे सुरु होते हे विशेष. येथे संबंधित कंत्राटदाराने ही नवीन शक्कल लावली आहे.सध्या नदीपात्रात ट्रॅक्टरचा मेळावा दिसत आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर हा रेती घाट आहे. रेतीचे ट्रक भरून मध्यप्रदेशात ओव्हरलोड वाहतूक येथे केली जात आहे. मध्यप्रदेशात वाहतुकीची वेगळी रॉयल्टी आहे. परंतु महाराष्ट्रात रेती नेणाºया ट्रॅक्टर मालकांना मध्यप्रदेशाची रॉयल्टी नेता काय? अशी विचारणा घाटावर सुरु असल्याची धक्कादायक माहिती आहे. घाटाची सीमा कुठून कुठपर्यंत आहे याची माहिती येथे अद्याप गुलदस्त्यात आहे.महसूल नियमानुसार रेती घाटात ट्रॅक्टर व अन्य वाहन केवळ जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतरच नेता येते. तशी नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात करावी लागते. येथे ५० ट्रॅक्टरनी तशी नोंदणी केली काय? हा मुख्य प्रश्न आहे.सोंड्या व कवलेवाडा येथील रेती घाटांचा लिलाव झाला आहे. काही दिवसानंतर येथूनही रेती वाहतूक सुरु होणार आहे. रेती घाटावर तहसील प्रशासन, जिल्हा खनीकर्म अधिकारी व जिल्हाधिकाºयांचे नियंत्रण असते. रेती उत्खननाचे अतिशय कडक नियम राज्य शासनाने ठरविले आहेत. परंतु येथे कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार आतापासूनच सुरु झाला आहे. यापूर्वी तुमसर तालुक्यातील बाम्हणी, चारगाव येथील रेती घाटावर नियमबाह्य रेती उत्खननप्रकरणी महसूल प्रशासनाने कारवाई केली होती. महसूल प्रशासन येथे मेहेरबान दिसत आहे. रेती पात्रात पोकलँड मशीन मागील आठ दिवसापासून सर्रास रेती उत्खनन करीत आहे. येथील तलाठी मंडळ अधिकारी, महसूली अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
घानोड घाटात पोकलँडने रेतीचे खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:43 PM
तुमसर तालुक्यातील घानोड (सक्करधरा) रेतीघाटावर नियमबाह्य पोकलँड मशीनने सर्रास रेतीचे उत्खननसुरु आहे.
ठळक मुद्देडम्प करणे सुरु : महाराष्ट्रात दिली जाते एमपीची रॉयल्टी वाहतूक