आॅनलाईन लोकमतभंडारा : गोंदिया येथील विक्की गोपलानी यांच्या हत्येप्रकरणी आरोपी शोधण्यात तुमसर पोलिसांना अपयश आले. स्वत:चे अपयश उघड होवू नये, यासाठी पोलिसांनी निर्दोष व्यक्तींना अटक केली. ही कारवाई चुकीची असून या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी व दोषी पोलीस कर्मचाºयांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.अखिल भारतीय माळी महासंघ व काँग्रेसच्या वतीने या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना शनिवारला दिले. अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी, पोलिसांनी निर्दोश व्यक्तींना प्रमुख आरोपी असल्याचा आरोप करून अटक केली असून ते अन्यायकारक असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. या प्रकरणात तुमसर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा पथक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्यात आली. तब्बल दीड महिन्यानंतरही तुमसर पोलिसांना या प्रकरणातील धागेदोरे किंवा आरोपींना शोधण्यात अपयश आले.दरम्यान त्यांनी स्वत:चे अपयश लपविण्यासाठी व तपासाचा वाढता दबाव बघून पोलिसांनी बोरी येथील मुकेश कांबळे, निलेश कांबळे, निरुपा बेंदवार, रुपाली कांबळे, शारदा कांबळे, सुनिता कांबळे, हितेंद्र बेंदवार यांची चौकशी केली. त्यांचे बयान नोंदविल्यानंतर त्यांना परत पाठविले. या प्रकरणात गोपलानी कुटुंबाशी कुठलाही वाद विवाद किंवा आर्थिक व्यवहार नसतानाही पोलिसांनी केवळ आकसापोटी कालांतराने चौकशीच्या नावावर पोलीस स्टेशनला बोलाविलेल्या मुकेश कांबळे व हितेंद्र बेंदवार यांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली. असा आरोप सुधाकर कांबळे यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करुन मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक करावी व यात दोषी असलेल्या पोलीस कर्मचाºयांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देणाºया शिष्टमंडळात सुधाकर कांबळे, तुमसर तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष शंकर राऊत, मनोज भेदे, राजू लांजेवार, अविनाश उपरीकर, अरविंद भेदे, रोशन कांबळे, नामदेव कांबळे, महेश कांबळे, ऋषीजी खोब्रागडे आदींचा समावेश होता.कुटुंब सदस्यांना माहिती नाहीगोपलानी हत्या प्रकरणात कांबळे कुटुंबाला आरोपींसारखी वागणूक देण्यात आली असल्याचा आरोप कांबळे परिवाराने केला आहे. या बयानाच्या नावावर बोलाविण्यात आल्यानंतर मुकेश कांबळे व हितेंद्र बेंदवार यांना मुख्य आरोपी करून दोघांना अटक केली. मात्र या प्रकरणात त्यांच्या कुटुंबाला पोलीस प्रशासनाने कुठलीही माहिती दिली नाही. चौकशी दरम्यान दोघांनाही अटक केल्याची माहिती देताना पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोपही कांबळे परिवाराने केला आहे.हत्या प्रकरणात पोलिसांनी योग्य रितीने तपास केलेला आहे. परिस्थितीजन्य पुराव्यावरुन पोलिसांनी यातील दोषींना अटक केली आहे. या संदर्भात लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. अटकेची कारवाई योग्य आहे.-विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर.
हत्याप्रकरणात निर्दोषांवर केली पोलिसांनी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:36 PM
गोंदिया येथील विक्की गोपलानी यांच्या हत्येप्रकरणी आरोपी शोधण्यात तुमसर पोलिसांना अपयश आले.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : प्रकरण बोरी येथील हत्येचे, कुटुंबीयांचा आरोप