मॉकड्रिल : सुरक्षेसाठी केली विविध ठिकाणांची पाहणीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दहशतवादी संघटनाचे वतीने भारतात कुठेही दहशतवाही हल्ला होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सदर घातपात विरोधी तपासणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक भंडारा विनीता साहु यांच्या मार्गदर्शनात ही तपासणी करण्यात आली.मर्मस्थळे, आॅर्डन्स फॅक्टरी जवाहरनगर, आॅर्डन्स फॅक्टरी वॉटर वर्क्स कोंरभी, इंदिरा सागर गोसे धरण पवनी, बावनथळी प्रकल्प, जिल्हा पोलीस वायरलेस आॅटो रिपीटर भिलेवाडा यांना उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच घातपात विरोधी पथक व ठाणेदारांच्या मार्फत भेटी देवून तपासणी करण्यात आली. संबधितांना सतर्कतेबाबत सूचना दिल्या. तसेच संशयित इसमाच्या हालचाली बाबत जिल्ह्यातील गोपनीय यंत्रणा सक्रीय करण्यात आली. गोपनीय बातमीदार, पोलीस पाटील, ग्राम सुरक्षादल, पोलीस मित्र यांना सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व मंदीर, मज्जीद, हॉटेल, लॉजेस, धाबे, गर्दीचे ठिकाण, बसस्थानक, रेल्वे स्थानक यांची तपासणी करण्याबाबत, जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याबाबत सर्व संबधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रमख शहर भंडारा येथे मूख्य बस स्थानकावर संशयित बॅग आढळून आल्याबाबत मॉकड्रिल घेण्यात आली. तसेच बीट पेट्रोलींग कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त पेट्रोलिंग करण्याबाबत तसेच रुग्णालय सज्जतेबाबत सूचना दिल्या. घातपात विरोधी तपासणी दरम्यान अपर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, पोनी. बी. आर. गाडे, पोलीस निरीक्षक सिडाम, ठाणेदार भंडारा, बी.डी.डी.एस पथक, दामीनी पथक, दहशतविरोधी पथक, क्यिुआरटी, आरसीपी यांच्या उपस्थितीत घातपात विरोधी पथकाकडून यंत्राच्या साहाय्याने बॉम्ब शोधणारा श्वान टायसनच्या मदतीने तपासणी करण्यात आली.
हल्ल्यांच्या बिमोडासाठी पोलीस सज्ज
By admin | Published: June 04, 2017 12:16 AM