लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील इतर मार्गावरून होणाऱ्या जनावर तस्करी विरूद्ध पोलिसांनी मोहीम उघडली आहे. एकाच दिवशी विविध वाहनांमधून २७ जनावरांची सुटका करण्यात आली. तब्बल २७ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केल्याने जनावर तस्करांचे धाबे दणाणले आहे.भंडारा तालुक्यातील कोरंभीकडे जाणाऱ्या मार्गावर एका वाहनातून जनावरे जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता त्यात सहा बैल आढळून आले. याप्रकरणी ठाचन सावजी वंजारी (१९) रा. दहेगाव ता. भंडारा याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या बैलांची किंमत ६० हजार रूपये आहे. राष्ट्रीय महामार्गावरील नागपूर नाका येथे बोलेरो पिकअप वाहनातून १३ जनावरे आणि दुसºया बोलेरो पिकअप वाहनातून ११ जनावरांची पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी बोलेरोचा चालक शमीर शंकर शेंडे (२३) कान्हळगाव आणि चालक प्रमोद सुभाष ढोबळे (२५) रा. राजेदहेगाव यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही सर्व जनावरे अपुºया जागेत आणि जनावरांना त्रास होईल अशा पद्धतीने वाहतूक करताना आढळून आले. पुरेशे खाद्य आणि पाण्याची व्यवस्था नव्हती. या कारवाईमध्ये गायी, म्हशी, रेडे, बैल आदींची सुटका करण्यात आली. भंडारा पोलीस ठाणे व जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.यासर्व जनावरांची रवानगी चांदोरी मालीपार येथील भागिरथी गौअनुसंधान आणि रेंगेपार येथील मातोश्री गोशाळेत करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आढोळे, बोरकर, साकोरे, कुथे, मोहरकर, डहारे, मेश्राम, कढव, तायडे, बेदुरकर, मडावी यांनी केली आहे.आठवडाभरातील एलसीबीची तिसरी कारवाईजिल्ह्यातून जनावरांची होणारी तस्करी रोखण्यासाठी एलसीबीने मोहीम उघडली असून आठवड्याभरातील ही तिसरी कारवाई आहे. जनावरांची क्रुर पध्दतीने वाहतूक केली जात असून या तस्करीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जनावर तस्करीविरूद्ध पोलिसांची धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:29 PM
राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील इतर मार्गावरून होणाऱ्या जनावर तस्करी विरूद्ध पोलिसांनी मोहीम उघडली आहे. एकाच दिवशी विविध वाहनांमधून २७ जनावरांची सुटका करण्यात आली. तब्बल २७ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केल्याने जनावर तस्करांचे धाबे दणाणले आहे.
ठळक मुद्दे२७ जनावरांची सुटका : एकाच रात्री २७ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त