तथागत मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सकाळपासून मतमोजणी दरम्यान फिरत असताना पोलिसाप्रती रोष न्याहाळत होतो. पोलीस म्हणजे ना एकदम वाईट, असे वाक्य कानी पडले. त्यामुळे पोलीस प्रशासनावर विश्वास उरला नाही अशी सामान्य नागरिकांसह सर्वांच्या तोंडी दिसली. राजकीय स्तरावर तर त्यांना सौजन्याची वागणूक तर सोडा साधे हक्काचे मानही मिळत नाही. सुरक्षेची मागणी रेटून धरणारे सुरक्षा बंदोबस्त नीट बजावू देत नव्हते. उलट त्यावर प्रतिक्रिया म्हणजे बोनस होते. सुरक्षा व सुव्यवस्थांची जबाबदारी पाळताना तणाव व असुविधा असल्यास कसे कर्त्यव्य पाळणार? याबाबत कुणीही विचार करताना दिसत नाही.पोटनिवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान पगारी पोलिसांच्या दारिद्र्याचे दर्शन पहावयास मिळाले. तापमानाचा पारा उच्चाकांवर असताना उकिरड्यावर बसून पहारा देताना दिसले. प्यायला पाणी नाही. उष्णतेपासून बचाव करण्याकरिता साधे छत नाही. तरी उन्हाची तमा न बाळगता येणाऱ्या जाणाऱ्याना चौकशीच्या फेऱ्यातून सोडणे व वेळप्रसंगी शिव्या खाऊनही शांतपणे कर्तव्य बजावणारी पोलीस कर्मचारी खरंच मानस आहेत याचे साक्षात्कार झाले.यापेक्षा म्हणजे वाईट त्यांना खायला अन्न उपलब्ध नव्हते. मिळेल त्या ठिकाणी हातात पडेल खाऊन आपल्या पोटाची भूक शांत करताना आढळले.पोटनिवडणुकीसाठी अनेक भागातील विशेष सुरक्षा जवानांसह पोलीस विभागाचे शेकडो कर्मचारी व भंडारा जिल्हा पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह पोलीस कर्मचारी हजार होते.मतमोजणी दरम्यान त्यांचा फौजफाटा पाहून त्यांच्या ताकदीची कल्पना येत होती. पण त्यांच्या या ताकदीचे परीक्षण केले असता आतून खचलेले व खिन्न भावमुद्रा पाहावयास मिळाल्यात. पोटात अन्न नाही, सुखलेल्या तोंडाची तृष्णा भागवण्यासाठी पाणी नाही.उन्हाच्या तडाख्यात स्वत:चे रक्षण करण्याकरिता जागा नाही. अशी वाईट अवस्था होती. लोकांची गर्दी आली रे आली की हातचे सोडून पुन्हा धावपळ. त्यांना शांत केलं की लगेच दुसरीकडे उन्माद पुन्हा धावपळ याव्यतिरिक्त काहीच दिसले नाही.दुपारचे १२ वाजले होते. उन्हाचा पारा भडकला होता. म्हणून सहज जेवणाची चौकशी केली. तर व्यवस्था नसल्याची माहिती मिळाली. समोर जाऊन पुन्हा पाहीले तर काही जण त्यांच्या वाहनात बसून डब्बे उघडताना दिसले. कॅमेरा पाहताच पुन: अलर्ट.अजून समोर गेलो तर काही जण ररस्त्याच्या आडोशाला कोरड्या चपात्या आणि दुकानातून विकत घेतलेला चिवडा खाताना दिसले. यानंतर पाणी कुठं आहे याचा शोध घेतला पण कुठेच दिसलं नाही. ५०० मीटरच्या आत शेकडो पोलिसांचा जमवाडा सुरक्षेकरिता तैनात होता. त्यामुळे आम्ही सुरक्षित असल्याचा भास झाला पण ते मात्र असुरक्षित दिसले. तरी तीक्ष्ण नजर व चोख बंदोबस्त आणि अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावर रोकठोक हजरजबाबी व धावपळ कायम दिसली.एकंदरीतच पोलिसांना विविध त्रासांना सामोरे जावे लागते. मात्र वरिष्ठांचे आदेशाचे पालन करणे तेवढेच गरजेचे आहे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे व्यथा जैसे थै राहतात.साहेब रॅलीत ड्युटी लागेल का जी ?पोटनिवडणुक मतदान दरम्यान जिल्ह्यातील अनेक पोलीस कर्मचारी व्यस्त आहेत. १५ दिवसांपासून अनेक पोलीस कर्मचारी नाकाबंदी दरम्यान यातना भोगत होते. मतमोजणी असल्यामुळे रात्रभर झोप नाही, पोटात अन्नाचे दाणे नाहीत व तहान भागवण्यासाठी पाणी नाही, अशाही परिस्थितीत कर्त्यव्य बजावणारे आत्ता सुटका होईल अशा अपेक्षेत असताना कुणीतरी विजयी रॅलीत बंदोबस्ताची माहिती दिली. तेवढ्यात एक आपल्या सह्काऱ्याजवळ आपली आपबिती सांगून माझी ड्युटी लागेल का जी म्हणून चौकशी करताना विव्हळत दिसला. काम करताना वेळेचे बंधन नसले तरी आवश्यक सुविधा तरी असणे गरजेचे असताना असुविधेच्या वातावरणात शिस्त म्हणून चाकरी करणारी खरंच ही मानस आहेत का, असा विचार येत होता.
पोलीस म्हणजे पो(ओ)लीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:28 AM
सकाळपासून मतमोजणी दरम्यान फिरत असताना पोलिसाप्रती रोष न्याहाळत होतो. पोलीस म्हणजे ना एकदम वाईट, असे वाक्य कानी पडले. त्यामुळे पोलीस प्रशासनावर विश्वास उरला नाही अशी सामान्य नागरिकांसह सर्वांच्या तोंडी दिसली. राजकीय स्तरावर तर त्यांना सौजन्याची वागणूक तर सोडा साधे हक्काचे मानही मिळत नाही.
ठळक मुद्देतनावग्रस्त स्थितीत पोलीसांचे जगणे: पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तात दिसल्या व्यथा