भंडारा : पोलीस मुख्यालय येथील पोलीस मैदानावर मंगळवारपासून पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ झालेला आहे. प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी घेतली जात आहे. २४ पोलीस शिपाई पदाकरिता ही भरती असून या पदासाठी ३ हजारापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत. कडेकोड बंदोबस्तात भरती प्रक्रिया घेतली जात आहे. पहाटे ४ वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गर्दी होत आहे. महामार्गावरील वाहतूक खोळंबू नये म्हणून पोलिसांची चमू महामार्गावर तैनात करण्यात येत आहे. २९ मार्च रोजी उपस्थित झालेल्या मागासवर्ग प्रवर्गात आवेदन भरले, परंतु पद रिक्त नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यांना अपात्र असल्याची पावती देण्यात आली. अशा अपात्र उमेदवारांना खुल्या प्रवर्गात (वयानुसार) भरतीमध्ये यावयाचे असल्यास त्यांनी ४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजतापासून ते सकाळी १० वाजतापर्यत पोलीस मुख्यालय येथे उपस्थित राहावे. ज्यांच्याकडे मुळ कागदपत्रे पूर्ण नसल्याने अपात्र ठरविले त्यांनी २९ मार्च पर्यतचे प्राप्त कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस भरती प्रक्रिया
By admin | Published: March 31, 2016 12:56 AM