लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पोलीस कवायत मैदानावर आयोजित जिल्ह्यातील पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप पार पडला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) कुलकर्णी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक साहू यांनी कर्मचाºयांना खेळाचे महत्त्व व फायदे सागताना म्हटले की, परिस्थिती ही नेहमी बदलत असते व त्यानुसार बदलणे आवश्यक असते.एका खेळाडू महिलेचे उदाहरण देतानी सांगितले की, या महिलेने रेल्वे अपघातात तिचे दोन्ही पाय गमावले होते. तरीपण ती निराश न होता स्वत:च्या खंबीर आत्मविश्वासाच्या बळावर तिने एव्हरेस्ट शिखर सर केले. आशावादी उदाहरणांना समोर ठेवून उत्कृष्ट कामगिरी खेळामध्ये दाखवावी, असे बोलून प्रेरीत केले. तसेच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.त्यावेळी उपस्थित असलेल्या जिल्ह्यातील पाच उपविभागांच्या खेळाडूंसह सदर स्पर्धेत १५० खेळाडूंनी भाग घेतला. पोलीस मुख्यालय, उपविभाग भंडारा, उपविभाग तुमसर, उपविभाग साकोली, उपविभाग पवनी येथील पोलीस पुरुष व पोलीस महिला यांचा समावेश होता.यामध्ये सांघिक खेळ हॉकी, फुटबॉल, हॉलिबॉल, बॉस्केटबॉल, हॅन्डबाल, कबड्डी, खो-खो, तसेच वैयक्तिक खेळामध्ये १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे, १५००० मीटर धावणे, ५००० मीटर धावणे, ४ बाय १०० मीटर रिले, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी, तिहेरी उडी यामध्ये विविध खेळाचे आयोजन करण्यात आले. संगीत खुर्ची या स्पर्धेमध्ये पोलीस अधीक्षक, अपर पोलीस रश्मी नांदेडकर तसेच पोलीस महिला कर्मचारी व कर्मचाºयांचे कुटूंबातील व्यक्तींचा खेळात समावेश करण्यात आला होता. रस्साखेच स्पर्धेमध्ये जिल्हा सत्र न्यायाधीश भंडारा साहेब व पोलीस अधिकारी यांनी भाग घेवून स्पर्धेला प्रोत्साहन दिले. या स्पर्धेमध्ये बेस्ट अॅथलॉटिक्स पुरुष पो.शि. महेश नैताम व बेट अॅथलॉटिक्स महिला पोलिस शिपाई माधुरी चामट यांनी प्रथम पारितोषिक मिळविले. तसेच चारही उपविभागापैकी पोलीस मुख्यालय येथील खेळाडु कर्मचारी यांनी प्रथम पारितोषिक मिळविलेले आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी भाषणातून मनापासुन स्वागत केले. तसेच पोलिसाबद्दल सागताना, पोलीस जर नसले तर जनतेत गुन्हेगारी वाढणार तसेच पोलीसांची डयुटीची वेळ ठरलेली नसते. त्यामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो, असे मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमाला मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस क्रीडासत्राचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:15 AM
पोलीस कवायत मैदानावर आयोजित जिल्ह्यातील पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप पार पडला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, ......
ठळक मुद्देसांघिक खेळाचा समावेश : विजेत्या चमूंना पुरस्कार