शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

९५ हजार बालकांना देणार पोलिओची ‘लस’

By admin | Published: March 30, 2017 12:29 AM

पोलीओ रोगाचे निर्मुलन करण्याच्या दृष्टिने मागील २० वर्ष देशासह राज्यात पल्स पोलीओ लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविली जात असून...

१०२२ केंद्र स्थापन : २,४६३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती, २ एप्रिल रोजी लसीकरणाचा दुसरा टप्पा भंडारा : पोलीओ रोगाचे निर्मुलन करण्याच्या दृष्टिने मागील २० वर्ष देशासह राज्यात पल्स पोलीओ लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविली जात असून २०११ ते १४ या कालावधीत पोलीओचा एकही रूग्ण न आढळल्याने भारत पोलीओमुक्त देश झाला आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पल्स पालीओ लसीकरण मोहिम आजही राबविण्यात येत आहे. २०१७ या वर्षातील दुसरा टप्पा २ एप्रिल रोजी राबविला जाणार असून ग्रामीण व शहरी भागातील ९५ हजार ८३८ बालकांना पोलीओचा डोज दिला जाणार आहे. या मोहिमेच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत मुख्य कायर्कारी अधिकारी एस. एल. अहिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके, डॉ. सादीक व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा आरोग्य विभागाने यशस्वी केला असून २ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात शहरी व ग्रामीण भागात १,०२२ पोलीओ बुथचे आयोजन करण्यात आले आहे. शहरी व ग्रामीण भागातील नियमित लाभार्थी व विटभट्टया, उस तोडणी कामगार स्थलांतरीत वस्त्या, भटकी जमात, बांधकाम सुरु असलेली ठिकाणे व जोखमीच्या भागातील लाभार्थी असे ९५ हजार ८३८ बालकांना या मोहिमेमध्ये लस देण्यात येणार आहे. ही मोहिम यशस्वीरित्या राबविण्याकरीता २ हजार ४६३ कर्मचारी व अधिकारी विविध भागात कार्यरत राहणार आहेत. बुथवरचे काम आटोपल्यानंतर शहरी भागात ५ दिवस व ग्रामीण भागात ३ दिवस कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमासाठी ६ हजार ६०० व्हॉयल (१ लाख ३२ हजार डोजेस) लसीचा साठा प्राप्त झाला आहे. या करीता आरोग्य विभागातील कमर्चाऱ्याव्यक्तरिक्त महिला व बाल विकास विभागांतर्गत ग्रामीण व शहरी भागात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्ती यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. १०० पेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या केंद्रावर ३ कमर्चारी व १०० पेक्षा कमी असलेल्या बुथवर २ कमर्चाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या मोहिमेसाठी ग्रामीण व शहरी भागासाठी २४६३ कमर्चारी २०९ पर्यवेक्षक कार्यरत राहतील. जागतिक आरोग्य सघटनेने सन १९८८ मध्ये पोलीओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले त्यानुसार राज्यात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिम दरवर्षी राबविण्यात येत आहे. यामध्ये ५ वर्षाखाली सर्व बालकांना पोलीओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. २१ वर्षे पोलीओ निर्मुलनाकरीता सर्वाचे योगदान लाभत आहे. १३ जानेवारी २०११ नंतर पोलीओ रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळेच भारताला पोलीओ निर्मुलनाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. पोलीओ निर्मुलनाची यशस्वीता विहित वयात प्राथमिक लसीकरण, या आधारस्तंभावर अवलंबून आहे. पोलीओ टाईप-२ जिवाणू १९९९ मध्ये पूर्ण पणे हद्दपार केले आहे. सन २०१० या वर्षात मालेगाव या शहरात चार व बीड जिल्ह्यात एक असे पाच रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले होते. पल्स पोलीओ मोहिमेचा दुसऱ्या टप्प्यामध्ये बालकांना लस देऊन १०० टक्के मोहिम यशस्वी करावी. एकही बालक पोलीओ लसीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व मुख्य कायर्कारी अधिकारी एस. एल. अहिरे यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)