शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

कारखान्याबाबत राजकारण तापले

By admin | Published: May 29, 2016 12:41 AM

तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो कारखाना मागील १० वर्षांपासून बंद आहे. सध्या खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरु असल्याचे समजते.

भाजप-शिवसेना आमने-सामने : कारखाना खरेदी-विक्री चर्चा जोराततुमसर : तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो कारखाना मागील १० वर्षांपासून बंद आहे. सध्या खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरु असल्याचे समजते. शिवसेनेने कारखाना सुरु करण्यासंदर्भात पुढाकार घेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला तर भाजपने शिवसेना श्रेययाचे राजकारण करीत असल्याचा आरोप लावला आहे. स्थानिक एका जि.प. सदस्याने सुध्दा शिवसेना पोळी शेकत असल्याचा आरोप केला आहे. येथे भाजप व सेनेत कलगीतुरा रंगणार असल्याचे दिसते.तुमसर तालुक्यात माडगी येथे युनिव्हर्सल फेरो (मॅग्नीज) शुध्द करणारा कारखाना सुमारे ४५ वर्षापूर्वी मुंबईच्या उद्योगपतींनी सुरु केला होता. थकीत वीज बीलापोटी कारखान्याची वीज कापण्यात आली. सन २००६ पासुन हा कारखाना आजतायगत बंद आहे. येथे नियमित व रोजंदारी सुमारे ११०० कामगार कार्यरत होते. वैनगंगा काठावर सुमारे ३०४ एकरात हा कारखाना उभा आहे. दरम्यान, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. कारखाना सुरु करण्याकरिता कामगार संघटनेने उपोषण, रास्ता रोको सारखे मार्ग अवलंबले. शेवटी प्रयत्न निष्फळ ठरले. काही कामगारांनी येथे स्वेच्छानिवृत्ती घेतली. काही कामगारांनी घेतली नाही. सध्या हे प्र्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान वीज वितरण कंपनीने सदर कारखान्याचे २०० कोटी रुपये वीज बिल माफ केल्याची माहिती आहे.राज्य व केंद्रात सत्ताबदल झाले. मागील १० वर्षात दोन टर्म सरकारचे निघून गेले. पंरतु काहीच हालचाली झाल्या नाही. केंद्र सरकारला दोन वर्ष झाले तर राज्यातील सरकारला दीड वर्ष लोटले. २५ दिवसांपूर्वी खासदार नाना पटोले यांनी हा कारखाना पतंजली उद्योग समूह घेण्यास इच्छूक असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्ह्यात राजकीय हालचालींना गती आली.शिवसेनेने १ जून रोजी कारखाना सुरु करण्यासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला आहे. अन्यथा मालकाने शेतकऱ्यांना त्यांच्या शेती परत करण्याची अट घातली आहे. तुमसर शहराला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्यामागे हा कारखानाच जबाबदार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. बेरोजगार व जनतेच्या हिताकरिता शिवसेना जिल्हा सेना प्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात आंदोलन करीत असल्याचेही नमूद केले आहे. (तालुका प्रतिनिधी)