शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

प्रदूषण नियंत्रण कार्यालय 'आॅक्सिजन'वर

By admin | Published: June 07, 2015 12:41 AM

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी भंडारा येथे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण ...

अधिकाऱ्यांचे पद रिक्तमाहिती देण्यास टाळाटाळभंडारा : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी भंडारा येथे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातील कारभार वाऱ्यावर आहे. कार्यालयातील प्रमुखाचेच पद रिक्त असल्याने कुणीही काही माहिती देण्यास सक्षम नाही. यामुळे मात्र दोन्ही जिल्ह्यातील उद्योगांवर विभागाचे वचकच राहिलेला नाही. वाढत चाललेल्या कॉक्रीटच्या जंगलामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. शिवाय मानव आपल्या सुविधांसाठी जंगलांचा ऱ्हास करीत आहे. यात उद्योगांची भर पडत चालली असून उद्योगांमुळे वातावरणात प्रदूषण पसरत आहे. प्रदूषण ही आजची सर्वात गंभीर समस्या म्हणून तोंड वर काढत आहे. वाढत्या प्रदूषणावर आळा बसविणे आज सर्वात महत्वाची बाब झाली आहे. या प्रदूषणावर आळा बसावा म्हणून झाडे लावण्याचा संदेश दिला जात आहे. मात्र उद्योगांतून मोठ्या प्रमाणात पसरत चाललेल्या प्रदूषणावर आळा घालणे हे सुद्धा तेवढेच गरजेचे झाले आहे.उद्योगांतून पसरत चाललेल्या प्रदूषणाच्या या प्रकारावर नजर ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत आहे. यात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी भंडारा येथे कार्यालय आहे. येथूनच भंडारा व गोंदियातील उद्योगांवर नजर ठेवली जाते व त्यांना वारंवार सूचना दिल्या जातात. मात्र आजघडीला या कार्यालयातील कारभारच प्रदूषीत झाला आहे. स्थानांतरणाच्या धोरणामुळे होते ते निघून गेले व त्यांच्या जागी मात्र अद्याप अधिकारी आलेच नसल्याचे चित्र आहे. परिणामी कार्यालयाचा कारभारच वाऱ्यावर आला आहे. कार्यालयात दोनच दिवसांपूर्वी रुजू झालेले फिल्ड आॅफीसर के.पी.पुसदकर, एक लिपीक व एक शिपाई कार्यरत आहेत. अशात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील उद्योग, यातील किती उद्योगांतून प्रदूषण निर्माण होत आहे, दोन्ही जिल्ह्यातील प्रदूषणाची पातळी याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती मिळू शकली नाही. एक तर पुसदकर नव्याने रूजू झाले आहेत. त्यामुळे कार्यालय तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा नवा असून त्यांच्याकडे माहिती नाही. शिवाय त्यांच्याकडे अद्याप अधिकृतपणे उप विभागीय अधिकाऱ्यांचा प्रभार देण्यात आलेला नसल्याने त्यांचे हात बांधले असल्याचे कार्यालयातूनच बोलले जात आहे. वाहनांची संख्या वाढल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. प्लॉस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही या प्लॉस्टिकचा वापर खुलेआम सुरू आहे. प्रदूषणाच्या अनेक समस्या असताना प्रदूषण मंडळाची कारवाई बोटावर मोजण्याइतकेच आहे.(नगर प्रतिनिधी) उद्योगांवर वचक कुणाचा?उद्योगांतून होत असलेल्या प्रदूषणावर नजर ठेवून त्यांना यावर आवर घालण्यासाठी विभागाकडून सूचना दिल्या जातात. मात्र आजघडीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालयच आॅक्सिजनवर असल्याने अशात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील उद्योगांसाठी रान मोकळे आहे. कुणीही दखल घेणारा नसल्याने उद्योगांतून पालन करावयाच्या सूचनांचा भंग करून मनमर्जीने काम करण्याचा प्रकार टाळता येणार नाही. अशात कार्यालयातील कारभार सुरळीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी अगोदर अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावयास हवी.पाचपैकी दोन जागा रिक्त भंडारा येथील कार्यालयाचे उप विभागीय अधिकारी भड यांचे सांगली येथे स्थानांतरण झाले. त्यानुसार ते १८ मे रोजी सांगलीला निघून गेले. कार्यालय प्रमुखाचे हे पद असल्याने लगेच त्यांच्या जागेवर दुसरे अधिकारी येणे अपेक्षीत होते. मात्र आजपर्यत त्यांच्या जागेवर दुसरे अधिकारी आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे पद रिक्त आहे. या शिवाय कार्यालयात दोन फिल्ड आॅफीसर, एक लिपीक व एक शिपाई एवढे कर्मचारी आहेत. यातही पुसदकर हे चंद्रपूरहून आले असून फिल्ड आॅफीसरचे दुसरे पद रिक्त आहे. चंद्रपूरवरून तीनच दिवसांपूर्वी आल्याने पुदसकर हे सुद्धा काही माहिती देण्यात असमर्थ आहेत.