रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार : तालुक्यात आठ तलावांची प्रक्रिया सुरूचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुकासह एकट्या सिहोरा परिसरात असणाऱ्या पाच मामा तलावात पुढील पाच वर्षाकरिता मत्स्यपालन व्यवसाय करण्यासाठी लिलावात काढणारी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे रोजगार व उत्पन्न वाढीची संधी व्यवसायीकांना उपलब्ध होणार आहे.तुमसर तालुक्यातील गावा गावात तलावाची संख्या आहे. एकट्या सिहोरा परिसरातील गावात एका पेक्षा अनेक मामा तलावांची नोंद आहे. वर्षभर पाण्याची साठवणूक असणाऱ्या मामा तलावात मत्स्यपालन करण्याची संधी उपलब्ध करणारी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे गावातच अनेकांना या व्यवसायातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक उत्पन्न वाढ व उदरनिर्वाहाचे साधन हा व्यवसाय उपलब्ध करणार आहे. तुमसर तालुक्यात मांढळ दोन हेक्टर ७० आर, मिटेवानी तीन हेक्टर ३० आर जागेतील मामा तलाव लिलावात मत्स्यपालन व्यवसायासाठी काढण्यात येणार आहेत. या शिवाय एकट्या सिहोरा परिसरातील पाच तलाव असून सोंड्या गावात असणाऱ्या चार मामा तलावाचा या लिलाव प्रक्रियेत समावेश करण्यात आलेला आहे.सक्करदरा गावातील ०.४० आर मधील तलावाची नोंद आहे. १ जुलै २०१५ ते ३० जून २०२० या कालावधी करिता मामा तलाव मत्स्यपालन व्यवसायासाठी लिलावातून दिले जाार आहे. या तलावाची लिलाव प्रक्रिया तुमसर पंचायत समितीत केली जाणार आहे. नियम व अटी शर्तीचे अधिन राहून लिलाव धारकांनी पालन करावे लागणार आहे. सोंड्या आणि सक्करधरा गावे सातपुडा पर्वत रांगा व घनदाट जंगलाच्या पायथ्याशी आहेत. या गावात रोजगारांचा अभाव आहे. मामा तलाव लिलावात काढण्यात येत असल्याने मत्स्यपालनाची नावे संधी मिळणार आहे.मत्स्यपालन व संगोपन करताना एका पेक्षा अनेक व्यक्तीची गरज राहत असल्याने ही सोनेरी संधी गाव शेजारी असणाऱ्या तलावातून मिळणार आहे. सोंड्या गावात अनुक्रमे ३ हेक्टर ९२ आर, १ हेक्टर १६ आर, ०.९४ आर, ०.१५ आर अशी जलक्षेत्र असणारी तलाव आहेत. ही तलाव लिलाव द्वारे देण्यात येणार आहे. (वार्ताहर)
मत्स्यपालनासाठी तलाव लिलावात काढणार
By admin | Published: June 16, 2016 1:07 AM