शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

भंडारातील पक्के अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:08 PM

शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमणाच्या बाबतीत भंडारा पालिकेने शुक्रवारी कठोर पाऊले उचलली. जिल्हा पषिरद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंतच्या एका बाजूचे अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात पाडण्यात आले. विशेष म्हणजे सदर मार्ग महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून या रस्त्याच्या बांधकामातील अडथळेही दूर झाले आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक : अनेक अतिक्रमण भुईसपाट

लोकमत न्युज नेटवर्कभंडारा : शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमणाच्या बाबतीत भंडारा पालिकेने शुक्रवारी कठोर पाऊले उचलली. जिल्हा पषिरद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंतच्या एका बाजूचे अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात पाडण्यात आले. विशेष म्हणजे सदर मार्ग महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून या रस्त्याच्या बांधकामातील अडथळेही दूर झाले आहेत.भंडारा नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस पोलिस विभागाच्या संयुक्तपणे शहरातील राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण यापूर्वी काढण्यात आले होते. यात मात्र दुजाभाव केल्याचा स्पष्ट आरोप नागरिकांनी केला होता. रस्त्याची मोजणी ते मार्किंगपर्यंतच्या कामात गौडबंगाल झाला, ही बाब नागरिकांनी खुलेआम बोलून दाखविली होती.अतिक्रमण करणे हा गुन्हा असताना तर गरिबांचीच अतिक्रमणे पाडण्यात येतात. श्रीमतांना मोहिमेपासून का वगळण्यात येते, असाही युक्तीवाद फुटपाथ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चेच्या वेळी केला होता. सदर दुजाभाव न करताना नियमानुसार सर्वांचेच अतिक्रमण हटविण्यात यावेत, अशी मागणी होती.यावर पालिकेने पुढाकार घेत शुक्रवारी कठोर भूमिका घेत सकाळी १० वाजतापासून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला सुरूवात केली. पाच फूटापर्यंत रेड मार्किंग केलेला भाग जेसीबीच्या सहायाने पाडण्यात आला. तणाव किंवा अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. बंदोबस्ताची कमान भंडाराचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय जोगदंड यांनी स्वत: सांभाळली होती.कुणालाही झुकते माप नकोशुक्रवारपासून आरंभ झालेला अतिक्रमण हटाव मोहीम इमाने इतबारे राबविली जावी, अशी चर्चा नेहमीच असायची. परंतु असे व्हायचे नाही. शुक्रवारी सुरू झालेली मोहीम खºया अर्थाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम ठरली. रस्त्याच्या मध्यभागापासून मोजमाप झालेल्या लाल मार्किंगपर्यंत असलेले सर्व अळथडे जेसीबीने तोडून टाकले. अशीच कारवाई रस्त्याच्या दुसºया बाजुने जेव्हा सुरू होईल तेव्हापण कुणालाही झुकते माप देवू नका, अशी चर्चा यावेळी ऐकायला मिळाली. राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्यावरील पूर्णपणे निघाल्यावर त्याचे त्वरीतच बांधकामही सुरू होणार आहे. तद्वतच रस्त्याशी संबंधी असलेली नालीचेही बांधकाम केले जाणार आहे. विशेष म्हणजे पोलिसांचा फौजफाटा पाहण्यासारखा होता. यावेळी पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.च्वर्षभरातील पालिका प्रशासनातर्फे अतिक्रमण निर्मूलनाची ही चवथी मोहीम होती. यापुर्वी शास्त्री चौक ते त्रिमुर्ती चौकापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र विद्यमान घडीला स्थिती जैसे थे आहे. मध्यंतरी या मोहीमेनंतर शहरातील गल्लीबोडीतही अतिक्रमण काढण्यात यावे, ही मागणी जोर धरू लागल्यानंतर अंतर्गत रस्त्यांवरीलही अतिक्रमण काढण्यात आले होते. मात्र अतिक्रमण हटावचा हा दरारा जास्त दिवस टिकू शकला नाही. निधीचा वाणवा व नियोजनाचा अभाव या दोन बाबींमुळे भंडारा शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा कायम तेवत आहे. याकडे सर्वांनीच सहकार्य व पुढाकार घेवून समस्या सोडविण्याची नितांत गरज आहे.वाहतूक बंदसदर रस्त्यावरील अतिक्रमण हटविताना पालिकेने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली होती. सकाळी १० वाजतापासून सुरू झालेली मोहीम सायंकाळपर्यंत सुरू होती. परिणामी वाहतूक बंद असल्याने अनेकांना या मार्गावरील उपरस्त्यांचा आधार घ्यावा लागला. आता दुसºया बाजूकडे अतिक्रमण हटाव मोहिमेवर नागरिकांचे लक्ष लागले आहेत.