देवानंद नंदेश्वर/इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार ८९७ हेक्टर क्षेत्रावर प्रामुख्याने तपकीरी तुडतुडा, पाने गुंडाळणारी अळी व करपा किडीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे, असे असताना मात्र कृषी विभाग उपाययोजना सोडून केवळ उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार करीत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.जिल्ह्यात यावर्षी १ लाख ८२ हजार ७६२ क्षेत्र धानपिकासाठी निर्धारित करण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ५४ हजार ८९७ हेक्टर म्हणजे ८४.७५ हेक्टर क्षेत्रात धानपिकाची लागवड करण्यात आली. सुरुवातीला पाऊस नसल्यामुळे येथील कोरडवाहू शेतकºयांचे कंबरडे मोडले होते तर आता ज्यांच्याकडे पाण्याचे साधन उपलब्ध होते त्यांनी कशीबशी धान पीक जगवले. आता कीडरोगाचा प्रादुभार्वाने या वर्षी पीक होणार की नाही अशी चिंता येथील धान उत्पादक शेतकºयांना सतावत आहे. दुरूनच मनाला मोहून टाकणारी धानाची शेती सगळीकडे दिसायला लागली.मात्र हा केवळ भास असून दुरून हिरवेगार धानाचे शेत हे जवळून पाहिले असता या धानाच्या पिकाला विविध कीडरोगाने ग्रासले आहे. अशी स्थिती संपूर्ण भंडारा जिल्ह्यात आपले पाय पसरत आहे. या मागे वातावरणात वाढता दमटपणा हे मुख्य कारण आहे. त्यामुळे या हंगामात भंडारा जिल्ह्यातील शेतकरी तूर्तास तरी संकटात सापडला आहे. पावसाने पाठ फिरविल्यामुळे सर्वस्वी पावसावर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकºयांनी शेती केली नाही. मात्र ज्या शेतकºयाकडे पाण्याची उपलब्धता होती त्यांनी कशीबशी हिम्मत करीत धान पीक लावले.मात्र हे पीक गर्भातच असताना आता या पिकावर तपकीरी तुडतुडा, पाने गुंडाळणारी अळी, करपा सारख्या किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे धान उत्पादक शेतकºयांना चिंता सतावीत आहे. कृषी विभाग मात्र केवळ सल्ला देत बघ्याची भूमिका घेत आहे. भंडारा जिल्ह्यात तब्बल १३३० मिलीमीटर हुन अधिक पाऊस दरवर्षी पडत असतो.मात्र आतापर्यंत १ जून ते २५ सप्टेंबरपर्यंत केवळ ८३१. ५ मिलीमीटर म्हणजेच केवळ ६७ टक्के इतकाच पाऊस पडला. यावर्षी येथील शेतकरी आधीच पेचात पडलेला होता. मात्र आता अधून मधून पडणाºया पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात दमटपणा निर्माण झाला असून, हे वातावरण कीड रोगाकरिता पोषक असल्यामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असला तरी अद्यापर्यंत कृषी विभागाकडून किटकनाशक औषधींचे वितरण रखडले आहेत. त्यामुळे त्यांना कृषी केंद्रातून महागडी औषधीचा वापर करावा लागत आहे.शेतकरी आर्थिक संकटातयावर्षीच्या खरीप हंगामात सुरूवातीपासूनच निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्यस्थितीत किडीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शेतकरी महागडी औषधी खरेदी करून पिकावर फवारणी करीत आहेत. फवारणी करणाºया मजुराला एकरी ५०० रूपये द्यावे लागत आहे. मात्र या फवारणीमुळे पीक आटोक्यात येत नसल्याने शेतकरी उपाययोजना करून पीक वाचविण्यासाठी आटापिटा करीत आहे.अधिकारी सूचवतात कागदावर उपाययोजनाकिडीच्या प्रादूर्भावाने शेतकरी त्रस्त असताना कृषी विभागाकडून मात्र कागदावर उपाययोजना सुचविल्या जात आहे. ही उपाययोजना सुचविण्यासाठी जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी सरसावले दिसून येत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना या अधिकाºयांनी मार्गदर्शनासह किडनाशक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
दीड लाख हेक्टरवर किडींचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 9:58 PM
भंडारा जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार ८९७ हेक्टर क्षेत्रावर प्रामुख्याने तपकीरी तुडतुडा, पाने गुंडाळणारी अळी व करपा किडीचा प्रादूर्भाव झाला आहे.
ठळक मुद्देशेतकरी संकटात : कृषी विभागाचा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार