प्रकरण अत्याचाराचे : पोलिसांनी केला घटनास्थळाचा पंचनामाभंडारा : लाखांदूर येथील एका १६ वर्षीय मुलीवरील सामूहिक अत्याचाराची चित्रफित व्हायरल करण्यात आली. ज्या मोबाईलवर ही चित्रफित प्रसारीत झालेली आहे ते सर्व जप्त करण्याची कारवाई पोलीस करणार असल्याने लाखांदुरातील मोबाईलधारकांंची त्रेधातिरपीट उडाली आहे. अनेकांनी चित्रफित ‘डिलीट’ केली. दरम्यान पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.२५ फेब्रवारीला लाखांदुरातील एका गरीब घरच्या मुलीला एका युवकाने पैशाचे प्रलोभन देऊन जंगलात नेले. तिथे युवक व त्याच्या अन्य मित्रांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यांनी या अत्याचाराची मोबाईलवर चित्रफित तयार केली. त्यानंतर सोशल मिडीयावर ती चित्रफित अनेकांना व्हायरल केली. दरम्यान तरूणांनी पीडित मुलीला याची माहिती कुणाला न सांगण्याची धमकी दिली. सदर चित्रफित ‘लोकमत’च्या हाती लागताच प्रकरण लावून धरले. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पाचही आरोपींना अटक केली. या सायबर क्राईम प्रकरणातील आरोपींचे मोबाईल जप्त केले असून त्यांच्या मोबाईलवरून ज्या कुणाला चित्रफित पाठवली. त्यांचा शोध सुरू केला आहे. आता चित्रफित असलेल्या सर्वांचे मोबाईल जप्तीची कारवाई होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने आज प्रकाशित केले. यामुळे चित्रफिती बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांचा ससेमिरा लागण्याच्या भीतीने अनेकांनी चित्रफित ‘डिलीट’ केली. चित्रफित बघून अनेकांना पाठवून पीडितेची बदनामी करण्यासाठी प्रयत्न करणारे आता सहआरोपीच्या पिंजऱ्यात सापडणार आहेत. (शहर प्रतिनिधी)शुक्रवारी भंडारा येथे निषेध मोर्चापीडित मुलीवरील अत्याचाराचा निषेध मोर्चा शुक्रवारला भंडारा येथे काढण्यात येणार आहे. अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शहरातील शास्त्री चौकातून दुपारी १२ वाजता निघणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.प्रकरणावर पांघरून घालणाऱ्या पोलिसांनी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच तब्बल १५ दिवसानंतर कारवाई केली. आरोपींना अटक करून पुरावे गोळा करण्यामागे पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे. आता त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून जप्त केलेले कपडे प्रादेशिक प्रयोगशाळेकडे पाठविले आहे.
कारवाईच्या धास्तीने अश्लील चित्रफीत ‘डिलीट’
By admin | Published: March 16, 2017 12:20 AM