इंद्रपाल कटकवार भंडाराबदलत्या काळानुसार टपाल विभागाने ही आधुनिकीकरणासाठी कात टाकली आहे. भंडारा जिल्ह्यातील प्रधान डाकघरातही आधुनिक साहाय्याने कामे पूर्ण केली जात आहे. जिल्हयात १२० ग्रामीण डाकघर असून उपडाकघराची संख्या १८ आहे. आज ९ पासून टपाल दिन कार्यक्रम म्हणून सप्ताहाभर विविध कार्यक्रमाचेही आयोजन प्रधान डाकघरामार्फत राबविले जाणार आहेत. जगात ९ आॅक्टोंबर १९६९ मध्ये जपान येथील टोकीया शहरात युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्यावतीने आंतरराष्ट्रीय टपाल सेवेला प्रारंभ करण्यात आला होता. टपाल सेवेला सुरु होऊन जवळपास १५३ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. दरवर्षी जगातील १५० देशांमध्ये आंतरराष्ट्रीय टपाल दिन साजरा केला जातो.भंडारा जिल्हयात सन १९८१ मध्ये प्रधान डाकघराचे कार्य नियमितरीत्या सुरु झाले. जिल्ह्यात १३९ डाकघर असून त्यात भंडारा शहरात प्रधान डाकघर आहे. यात कार्यालयामार्फत रेल्वे बुकिंग सेवा, बचत बँकेचे व्यवहार, आवर्ती जमा खाते, राष्ट्रीय बचत खाते, टाईम डिपॉझीट, वरिष्ठ नागरिक सेवा, दूरध्वनी व इलेक्ट्रीक बिल सेवा, मायस्टॅम्प सेवा, सुकन्या समृध्दी योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा व जनधन योजना यासह अन्य योजना डाकघरामार्फत चालविण्यात येत आहेत.
आधुनिकीकरणात टपाल विभागाने टाकली कात
By admin | Published: October 10, 2015 12:58 AM