डांबरी रस्त्यावर खड्डे पडलेले असून रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला पाणी साचत असते. ग्रामपंचायतने डांबरी रस्त्यावरील खड्डे मातीने भरले असल्याचे दिसून येत आहे. डांबरी रस्त्यावरील खड्डे मातीने बुजविल्याने पावसामुळे खड्ड्यातील माती रस्त्यावर येत असल्याने रस्ते चिखलाने व घाणीने माखलेले दिसून येतात. मुरमाडी (सावरी) ग्रामपंचायतचा परिसर लाखनी शहराला लागून आहे. त्यामुळे मुरमाडीतील वस्ती वाढलेली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ७५३६ मुरमाडीची लोकसंख्या होती. ती २०२१ ला १० हजारांच्या वर झालेली आहे. नवीन कॉलनी तयार झालेली आहे. नागरी ग्रामपंचायत म्हणून मुरमाडी येथे अनेक शासकीय योजना मंजूर होत असतात. मुरमाडी ग्रामपंचायतचा ३५ लाख रुपयांच्या वर गृहकर लोकांकडून गोळा होत असतो. ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांचे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असून ठेकेदारी करून तुंबडी भरण्याचा प्रयत्न सुरू आहे.
डांबरी रस्त्यावरील खड्डे मातीने बुजविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:42 AM