राजू बांते ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : बांधकाम मंत्र्यांनी खड्डे बुजवा मोहीम फत्ते केली. परंतु ही खड्ड्यांची मलमपट्टी झाल्याने पुन्हा तुसमर-भंडारा राज्यमार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. आता हे खड्डे व चाळण झालेला राज्यमार्ग मृत्यूचा कर्दनकाळ ठरण्याची बांधकाम विभाग प्रतिक्षा करीत आहे.राज्यात खड्डे मुक्तीची शासनाच्या बांधकाम मंत्र्यांनी स्वत:ची पाठ थोपटवून घेतली. खड्यांची मलमपट्टी केली. सुरक्षित रस्ते करण्याचा देवाखा निर्माण केला गेला. त्यानंतर काही दिवसांनी त्या खड्यांची स्थिती पूर्ववत झाल्याने ही खड्यांची मलमपट्टीच होती हे सिद्ध झाले. पावसाळा सुरू झाला आहे.भंडारा-तुमसर या राज्यमार्गावर अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे पडले आहे. वरठीच्या बायपास रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. बोथली-मोहगावच्या भागात रस्त्याला मोठमोठी खड्डे पडली आहेत. या खड्ड्यात पावसाचा पाणी साचून राहतो. खड्डा पाण्याने भरला जातो. परिवहन करताना खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज येत नाही. त्यामुळे, खड्ड्यात वाहन गेल्यानंतर वाहनधारकांना जीवघेणी अनुभूती येते.राज्य शासनाच्या बांधकाम खात्यानंतर खड्डे बुजवाचा फर्मान आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवाची मोहिम हाती घेतली. घाईघाईने खड्डे बुजविण्याचे काम झाले. काही दिवसाच खड्ड्याची स्थिती तिच झाल्याने खड्ड्यावर मलमपट्टी करण्यासाठी खर्च पाण्यात गेला आहे. जागोजागी पडलेले खड्डे राज्यमार्गावरचे मृत्युचे साफळे तयार झाल्याचे दिसून येते. आता हे पडलेले खड्डे कुणाचे प्राण गेल्यानंतरच बुजविले जातील काय असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.धोकादायक ठिकाणसुर नदीवरचा पुल नव्याने तयार झाला. तथापि, भंडाराकडे जाणारा पुलाच्या काठावरचा भाग अतिशय धोकादायक बनला आहे. पुलाच्या काठावरची माती दबल्या गेली. त्यामुळे तो भाग खोलगट बनला आहे. तुमसरहून मोहाडीकडून येणारी वाहने त्या भागात आदळतात. त्यामुळे प्रसंगी मोठा धोका होण्याची भीती अनेक वाहनधारकांनी व्यक्त केली. दररोज या मार्गाने जी वाहन जातात त्यांना त्या भागाची जाणीव झाली आहे. त्यामुळे ते वाहनधारक त्या ठिकाणाहून वेग कमी करतात. धोका टाळण्याचा प्रयत्न करतात. पण, नवीन वाहनधारकांना ही जागा जीवघेणी ठरू शकते. एखाद्या मोठ्या प्रसंगाची बांधकाम विभाग प्रतिक्षा करीत आहे काय असा सवाल निर्माण केला जात आहे. युद्धपातळीवर भंडारा, तुमसर राज्य मार्गावरचे खड्डे बुजविण्याचे काम व मोहगाव देवी येथील सुरनदीवरचा पुलाचा तो धोकादायक भाग तातडीने दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते राजू कारेमोरे, नरेश ईश्वरकर, काँग्रेसचे गजानन झंझाड यांनी केली आहे.
मृत्यूला आमंत्रण देणारे राज्य मार्गावर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 11:20 PM
बांधकाम मंत्र्यांनी खड्डे बुजवा मोहीम फत्ते केली. परंतु ही खड्ड्यांची मलमपट्टी झाल्याने पुन्हा तुसमर-भंडारा राज्यमार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. आता हे खड्डे व चाळण झालेला राज्यमार्ग मृत्यूचा कर्दनकाळ ठरण्याची बांधकाम विभाग प्रतिक्षा करीत आहे.
ठळक मुद्देरस्त्याची चाळणी : शासनाचा लाखोंचा पैसा ठरला व्यर्थ