बाॅक्स
अधिकच्या युनिटवर अधिकचा चार्ज
० ते १०० युनिटसाठी ३.४४ रुपये व १०१ ते ३०० युनिटसाठी ७.३४ रुपये दर आकारला जाताे. मात्र एखाद्या वीज ग्राहकाचे समजा त्या महिन्यात १०५ युनिट जळाले तर या सर्व युनिटवर ७.३४ रुपये एवढा दर आकारला जाताे असा गैरसमज आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नसून १०० युनिटवर ३.४४ रुपये व उर्वरित ५ युनिटसाठी ७.३४ रुपये एवढा दर आकारुन वीज बिल पाठविले जाते.
० ते १०० ३.४४ रुपये
१०१ ते ३०० ७.३४ रुपये
३०१ ते ५०० १०.३६ रुपये
५०१ ते १००० ११.८२ रुपये
१००० पेक्षा अधिक ११.८२ रुपये
बाॅक्स
महिन्याच्या त्याच दिवशी रीडिंग हाेणे आवश्यक
शहरातील प्रत्येक वाॅर्डाचा दिवस ठरवून देण्यात आला आहे. त्याच दिवशी रीडिंग हाेणे अपेक्षित आहे. मात्र रीडिंग करणारे मजूर त्या दिवशी रीडिंग न करता दाेन ते तीन दिवसांनी उशिरा रीडिंग करतात व त्याचा फटका ग्राहकांना बसताे . त्यामुळे वेळेत रीडिंग घेणे आणि वेळेत रीडिंग घेणे आणि वेळेतच बिल देणे महत्त्वाचे आहे.