तथागत मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : धकाधकीच्या जीवनात शिक्षणाला फार महत्त्व आहे. पण रोजगार व नोकरीसाठी होणारी वणवण जीवनात अनेक आवाहन उभे करते. अशाही स्थितीत अल्पशिक्षण व गरिबी यावर मात करून छंदातून स्वप्न साकारण्याची किमया श्यामराव बोरकर यांनी केली आहे. स्वप्नातील चित्राचे हुबेहूब रेखाटन करण्यात माहीर असलेले चित्रकार म्हणून त्याची ख्याती आहे. साधी राहणी व प्रसिद्धी पासून दूर असलेल्या या चित्रकाराला दूर-दूरच्या कामाच्या आॅफर असल्याने त्यांच्यापासून युवकांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे.श्यामराव बोरकर हे बीड सीतेपार येथे राहतात. त्यांचे मूळ गाव गोंदिया जिल्ह्यातील गोंडमोहाडी आहे. लहान पनापासून त्यांना चित्र व मुर्त्या तयार करण्याचा छंद होता. घरात अठराविश्व दारिद्य असल्यामुळे त्यांना पाहिजे ते शिक्षण घेता आले नाही. गावातच चवथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाची इच्छा असूनही घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागले. गावात दुष्काळ पडल्यामुळे बाहेर कामाला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत त्यांनी छंद सोडला नाही. छंदातून आयुष्य उभा करून जगता येते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.लग्नानंतर घर सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडावे लागले. अनेक दिवस बाहेर कामासाठी भटकावे लागले. कामानिमित्त भोपाळ येथे काही दिवस घालवले. दरम्यान त्यांना असलेला चित्रकलेचा छंद शिकून घेतला.भोपाळ येथील मूर्तिकार यांचेकडे काम करताना या क्षेत्रातील बारकावे शिकून घेतले. डोक्यात असलेले चित्र हातातून रेखाटण्याची कला अवगत केली. प्रसिद्धी पासून दूर असल्यामुळे त्यांची कला समोर नेता आली नाही.जिल्ह्यातील अनेक शाळा व ग्राम पंचातीचे सुंदर चित्रण त्यांनी केले आहे. त्यांनी रेखाटलेल्या बीड ग्रामपंचातील राष्ट्रीय पुरस्कार हा त्यांच्या कल्पनेचा एक पुरस्कार होता. थोरपुषाच्या मूर्ती यासह सुंदर देखावे व सुंदर स्वच्छ भारत याबाबद अनेक रेखाटण त्यांनी केले आहे. सध्या स्थितीत डिजिटल चित्राची धूम आहे. यामुळे हा व्यवसाय डबघाईस आला असल्याची अनेक चित्रकारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत असतो.
चित्रकलेच्या छंदाने मिळाली जगण्याची ताकद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:45 PM
धकाधकीच्या जीवनात शिक्षणाला फार महत्त्व आहे. पण रोजगार व नोकरीसाठी होणारी वणवण जीवनात अनेक आवाहन उभे करते. अशाही स्थितीत अल्पशिक्षण व गरिबी यावर मात करून छंदातून स्वप्न साकारण्याची किमया श्यामराव बोरकर यांनी केली आहे.
ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : श्यामराव बोरकर यांनी साकारले स्वप्न