दिनेश रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव (दिघोरी) : भारनियमनापासून काही दिवसच दिलासा मिळाला असून पुन्हा ग्रामीण भागांसाठी पंधरा ते सोळा तास बत्ती गुल राहत असून ग्रामीणांसाठी हा भारनियमन जिवघेणा ठरत आहे.निवडणुकीमध्ये जनतेला भारनियमन मुक्तीचे आश्वासन दिले होते. काही दिवस विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला. आता मात्र ग्रामीण भागामध्ये १५ ते १६ तास भारनियमन करण्यात येत असल्याने ते दिवस गावकऱ्यांसाठी दिवा स्वप्न ठरले आहे.धारगाव विद्युत उपकेंद्रा अंतर्गत येणाºया सर्व गावांमध्ये १५ तास विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्याने गावांमध्ये रात्रीला अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शेतीला सिंचन कसे करावे, हा प्रश्न शेतकºयांना पडला आहे तर, विजेवर चालणारे उद्योग करणाºया ग्रामीणांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. शहरी विभागात विद्युत पुरवठा खंडित केल्या जात नाही. मात्र ग्रामीण जनतेला अंधारात ठेवल्या जात आहे. शासनाच्या भेदाभेदपणामुळे शासनाप्रती तीव्र संताप निर्माण होत आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामीण जनतेच्या उत्साहामध्ये खंड पडत आहे.धारगाव उपकेंद्राअंतर्गत कृषीपंपासाठी वेगळी फिडर बसविण्यात आली नसल्याने हा केंद्र डी ग्रुपमध्ये आहे. त्यामुळे भारनियमनाचा फटका या केंद्राला सर्वात जास्त पडत असल्याची माहिती विद्युत विभागातून देण्यात आली आहे. कृषी पंपाचे फिडर वेगळे झाले तर ही समस्या लवकर सुटण्यास मदत होणार आहे. मात्र आता जिवघेण्या भारनियमनाने ग्रामीण जनता फार त्रस्त आहे.धारगाव उपकेंद्र डी ग्रुपमध्ये आहे. आठवडाभरात भारनियमनामध्ये सुधारणा होणार.-पी.जे. भोयर, सहायक अभियंता (ग्रामीण) भंडारा.
केवळ सात तास वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:06 PM
भारनियमनापासून काही दिवसच दिलासा मिळाला असून पुन्हा ग्रामीण भागांसाठी पंधरा ते सोळा तास बत्ती गुल राहत असून ग्रामीणांसाठी हा भारनियमन जिवघेणा ठरत आहे.
ठळक मुद्देग्राहकांचा आक्रोश : धारगाव फिडरवरील भारनियमन ठरतेय जीवघेणे