लाखनीत आढावा बैठक : बाळा काशिवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देशलाखनी : पाण्याची समस्या गंभीर असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांना विद्युत पुरवठा करण्याचे निर्देश आ. बाळा काशिवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. स्थानिक पंचायत समितीद्वारे श्रीराम मंगल कार्यालयात आ. बाळा काशीवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमच सर्व विभागाच्या कार्याचा लेखाजोखा घेणारी आढावा सभेचे आयोजन करण्यात आले.प्रास्ताविक तहसीलदार जे.बी. पोहनकर यांनी केले. याप्रसंगी पंचायत समितीच्या विविध विभागांच्या कार्याचा आढावा घेतला. यात कृषी विभागाचे जांभुळकर, पंचायत विभागाचे जी.पी. चकोले, बांधकाम विभाग धनंजय बागडे, आरोग्य विभाग डॉ.मिलिंद मोटघरे, शिक्षण विभाग मोरेश्वर कोरे, पशुधन विकास विभाग वाकचौरे, मग्रारोहयो राहुल गिऱ्हेपुंजे, ग्रामीण पाणी पुरवठा रहाटे, शाखा अभियंता मारबते, उद्योग विभागाचे लंजे व राज्य शासनाचे कृषी विभाग, महावितरणचे अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाची माहिती दिली व शासकीय अडचणी स्पष्ट केल्यात. गाव रस्त्यावरील विद्युत खांबांना विद्युत पुरवठा करण्यास अडचणी येत असल्याने त्वरीत विद्युत पुरवठा करण्याचे निर्देश आ. काशिवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. सभेला पंचायत समिती सभापती सूर्यभान सिंगनजुडे, जिल्हा परिषद सदस्य रुपलता जांभुळकर, विजया शहारे, विजय खोब्रागडे, भरत खंडाईत, ऋषी इनवाते, पंचायत समिती सदस्य, ७२ ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन खंडविकास अधिकारी हेमंत मेहर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
पाणी पुरवठ्यासाठी वीज पुरवठा करा
By admin | Published: April 20, 2015 12:49 AM