वरठी : आठ दिवसापासून वरठी व परिसरातील गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवभरात विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या संख्येने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहे. २४ तासातील प्रत्येक तासात विद्युत पुरवठा अचानक बंद होतो. यामुळे घरगुती वर व्यवसाईक उद्योग धंद्यात वापरल्या जाणारे विद्युत उपकरणाची एैसीतैसी होत आहे.४ मे पासून वरठी व परिसरात विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होण्याची परंपरा सुरू झाली. रात्रभर विजेचा लंपडाव सुरू होता. ग्रामीण भागातील बहुतांश गावात रात्रभर अंधार होता. विद्युत पुरवठा खंडीत होण्याची परंपरा झालेली नाही. आठ दिवसापासून दर तासात दोन तीन वेळा अचानक विद्युत पुरवठा खंडीत होवून पुन: पुन: चालु बंद होत राहतो. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. वरठी व परिसरात विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकरण नवीन नाही पण सध्या स्थितीत पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकरणात वाढ झाली नाही. दिवस रात्र लपंडाव सुरू राहतो. (वार्ताहर)
वरठीत विजेचा लपंडाव
By admin | Published: May 13, 2016 12:40 AM