प्रकरण साठे महामंडळातील : मोठे मासे गळाला लागणारभंडारा : अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या भंडारा जिल्हा कार्यालयात २४ कोटी ६९ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेले जिल्हा व्यवस्थापक प्रताप पवार याला न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे गैरव्यवहार उजेडात येण्याची शक्यता बळावली आहे. मातंग समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. गैरव्यवहाराचा ठपका प्रताप पवार यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांच्याविरुद्ध जून २०१५ मध्ये भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर पवार यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी पवार यांनी जामीनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. तथापि २७ जानेवारी रोजी त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला. गुन्हे अन्वेषण विभाग आणि भंडारा पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांच्या खात रोड येथील निवासस्थानी धाड घातली. परंतु पवार यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रारी पोलिसांना दिली. त्यानंतर मंगळवारी पवार यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय व त्यानंतर नागपूर येथील मेडीकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल बुधवारी सायंकाळी ४ वाजता त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर लगेच गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने प्रताप पवार याला अटक केली. अटकेनंतर त्यांना भंडारा येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आज सकाळी ११ वाजता पवार यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गैरव्यवहार चव्हाट्यात आणण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाची चमू त्याच्याकडून विचारपूस करीत आहेत. चौकशी करण्यासाठी भंडारा येथील महामंडळाच्या मुख्य कार्यालयासह मुंबई येथील कार्यालयात त्यांना नेण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथील पोलीस निरीक्षक अतुल लंबे यांनी दिली. (नगर प्रतिनिधी
प्रताप पवारला १६ पर्यंत पोलीस कोठडी
By admin | Published: February 05, 2016 12:28 AM