आॅनलाईन लोकमतसाकोली : कुंभली येथे दरवर्षी मकरसंक्रांतीला दुर्गाबाईडोह यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेसाठी प्रशासनातर्फे सर्वातोपरी तयारी करण्यात झाली असून भाविकांना दर्शनासाठी कुठलीही अडचण होणार नाही, अशा सुविधा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहेत. यासंदर्भात दुर्गाबाई मंदिरात जिल्हाधिकारी सुहास दिवसे, आमदार बाळा काशीवार यांच्या उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी यात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची सोय, भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था, पार्किंगची सोय, ठिकठिकाणी लाईटची सोय तसेच आंघोळीसाठी सोय व नदीच्या सभोवताल बॅरीकेटची सोय प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. यासाठी सर्वच विभाग कामाला लागले असून पोलीस प्रशासनातर्फे २५० पोलीस कमृचाºयाची सोय करण्यात येणार असून आरोग्य विभागातर्फे आरोग्य शिबिर लावण्यात येणार आहे.आढावा बैठकीला जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, दिपक मेंढे, सरपंच कमला भेंडारकर, उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत दिसले, तहसीलदार अरविंद हिंगे,पोलीस निरीक्षक पिपरेवार, तलाठी गेडाम, ग्रामसेवक संजय मोहोड, सहायक खंडविकास अधिकारी निर्वाण, मंडळ अधिकारी कारेमोरे यांच्यासह साकोली तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन मंडळ अधिकारी कारेमोरे यांनी केले.
दुर्गाबाई डोह यात्रेची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:01 AM
कुंभली येथे दरवर्षी मकरसंक्रांतीला दुर्गाबाईडोह यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेसाठी प्रशासनातर्फे सर्वातोपरी तयारी करण्यात झाली असून भाविकांना दर्शनासाठी कुठलीही अडचण होणार नाही, अशा सुविधा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहेत.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा