लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्ह्यातील पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाला प्रतिकूल असणाºया क्षेत्राची निवड करून पर्यावरण पूरक कारवाईसाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा पर्यावरण समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चरण वाघमारे, अॅड.रामचंद्र अवसरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आनंद काटोले, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, भगवान मस्के, अशासकीय सदस्य रवी येळणे यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी तयार केलेल्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालावर सखोल चर्चा करणे व शिफारसे करणे, जिल्ह्यातील पर्यावरणाचा ºहास झालेल्या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करून अशा संसाधनाच्या संवर्धनासाठी शिफारस करणे, पर्यावरण विभागामार्फत कार्यरत असलेल्या योजनांची योग्य अंमलबजावणी, पर्यावरण आघात मुल्यांकन अहवाल व जनसुनावणी व पर्यावरण ºहासाबाबत प्राप्त होणाºया तक्रारींची स्थानिक पातळीवर त्वरीत दखल घेणे यासह पर्यावरण संवर्धनाच्या इतर मुद्यांवर कारवाई करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पर्यावरण समिती गठीत करण्यात आली आहे.जिल्ह्यातील स्थानिक संस्थांनी पर्यावरण सद्यस्थिती अहवालाबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, नगरपालिकांनी अहवाल कसा तयार करावा याबाबत प्रादेशिक अधिकारी यांनी प्रशिक्षण द्यावे.२२ सप्टेंबर रोजी पवनी येथे मुख्याधिकारी यांची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत एक सादरीकरण करून याबाबतची सविस्तर माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिवसे यांनी दिल्या. यासोबतच जिल्ह्यातील पर्यावरणाला घातक असणाºया क्षेत्राचा सविस्तर अहवाल तयार करावा, असेही त्यांनी सांगितले.वैनगंगा नदीकाठच्या गावातील शेतीची अवस्था वाईट आहे. वनसंपत्तीचा नाश मोठ्या प्रमाणात होत असून याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होत आहे. त्याचप्रमाणे उद्योगांमध्ये पर्यावरणाचे निकष पाळले जातात किंवा नाही याबाबत सर्वेक्षण करण्यात यावे, असे आमदार चरण वाघमारे यांनी सूचविले. राईस मिल मधून निघणाºया धुळीच्या कणामुळे आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याच प्रमाणे वैनगंगा नदीमधील इकॉर्निया वनस्पतीमुळे मासे मृत पावत आहेत. नदीचे पाणी प्रदूषित होऊन पर्यावरणाला नुकसान होत आहे. या बाबीवर समितीने अभ्यास करून निर्णय घ्यावा असे मत आमदार अॅड.रामचंद्र अवसरे यांनी मानले.पर्यावरणाच्या उपाययोजनेबाबत प्रदूषण नियंत्रण विभागाने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिवसे यांनी दिल्या. समितीची बैठक प्रत्येक तिमाहीला घेण्यात यावी. असे त्यांनी सूचविले. मोठे उद्योग असलेल्या परिसरात प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याबाबत आरोग्य विभागाने सर्वेक्षण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राईस मिल आणि उद्योग पर्यावरणाचे निकष पाळतात किंवा नाही याबाबतचा सविस्तर अहवाल समितीला सादर करण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सूचना दिल्या.
पर्यावरणाबाबतचा सविस्तर अहवाल तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:50 PM
भंडारा जिल्ह्यातील पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाला प्रतिकूल असणाºया क्षेत्राची निवड करून पर्यावरण पूरक कारवाईसाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना ....
ठळक मुद्देसुहास दिवसे : जिल्हा पर्यावरण समितीची सभा, उद्योग व्यावसायिकांवर आता करडी नजर