राजकुमार बडोले : सानगडी येथील जिल्हा परिषद विद्यालयाचे स्रेहसंमेलनसानगडी : आजच्या युगात मुलांना स्पर्धेत भांडावे लागत आहे. त्यामुळे भविष्यातील स्वप्नांची तयारी आताच करा, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. येथील जिल्हा परिषद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्रेह संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. राहूल ठवरे (नागपूर) यांनी विद्यालयास दिलेल्या शारदा मातेच्या मुर्तीचे अनावरण ना. बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळा काशिवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती धनराज उंदीरवाडे, जिल्हा परिषद सदस्या रेखा वासनिक, अधिवक्ता नागपुर आनंद जिभकाटे, सरपंच रेखा वंजारी, केशव मांडवटकर, वसंता खंडाईत, यशवंत खंडाईत, तंमुस अध्यक्ष नितीन चंद्रवंशी, जनार्दन डोंगरवार, धनराज चांदेवार, चंद्रप्रकाश रामटेके, केंद्र प्रमुख मुंगमोडे तथा विद्यालयाचे प्राचार्य शाम ठवरे उपस्थित होते.स्रेहसंमेलनानिमित्त हस्तकला व विज्ञान तसेच कला प्रदर्शनीचे अवलोकन करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने प्रकाशित भरारी हस्तलिखीताचे विमोचन करण्यात आले. बौद्धीक तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य होमराज कापगते यांचे हस्ते तर अध्यक्ष म्हणून खासदार नाना पटोले तसेच उपाध्यक्ष म्हणून गोंदिया जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रचना गहाणे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सदाशिव वलथरे, उपशिक्षणाधिकारी चोले, मनोहर लोथे, किशोर गडकरी, महेंद्र वैद्य उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मोठे व्हायचे असेल तर स्वत:शीच स्पर्धा करा, असे नाना पटोले यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य शामठवरे यांनी केले. संचालन टी.टी. झंझाड तसेच आमदार एच.बी. मेश्राम यांनी मानले. स्रेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी डी.एच. मेंढे, लोणारे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे तथा शाळा समितीचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
भविष्यातील स्वप्नांची तयारी करा
By admin | Published: February 05, 2017 12:24 AM