महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये ३२ जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमात कोरोनाबाबत खबरदारी म्हणून शारीरिक अंतराचे बंधन पाळण्यात आले. त्यासोबतच मास्क वाटप करून जनजागृतीसुद्धा करण्यात आली. यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. लक्ष्मण पेटकुले, राष्ट्रीय छात्र सेनेचे कार्यक्रम अधिकारी लेफ्टनंट अरुण चव्हाण, शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. संजय आगाशे, डॉ. संतोष चौधरी यांनी परिश्रम घेतले. रक्त संकलनासाठी सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्णालयाच्या डॉ. रश्मी मलेवार, डॉ. पूजा गुप्ता, सतीश जाधव यांनी सहकार्य केले.
यावेळी डॉ. कविता लेंडे, प्रा. अमोल खांदवे, प्रा. रेणुकादास उबाळे, डॉ. राजेश दिपटे, प्रा. सुनील कान्होलकर आदी उपस्थित होते. संचालन प्रास्ताविक लेफ्टनंट अरुण चव्हाण यांनी केले तर आभार प्रा. लक्ष्मण पेटकुले यांनी मानले.