शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

प्राथमिक शिक्षकाने कारची ॲम्बुलन्स करून काेराेना काळात दिली माेफत सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 5:00 AM

त्यांच्याकडे असलेल्या कारची त्यांनी ॲम्बुलन्स केली. ग्रामीण भागातील रुग्णांना निशुल्क भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणत हाेते. तीन महिन्याच्या काळात त्यांनी जवळपास ५० काेराेनारुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी कुणाकडूनही एक पैसाही घेतला नाही. डिझेल आणि चालकाचा खर्चही त्यांनी आपल्या पगारातून केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण भागात शिक्षकाची नाेकरी करताना तेथील समस्या जवळून अनुभवताना काेराेना काळात रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी हाेणारे हाल एका शिक्षकाने अनुभवले. आपल्याला काय करता येईल, असा विचार करतानाच स्वत:ची कार ॲम्बुलन्समध्ये परावर्तीत करून तीन महिने रुग्णसेवा केली. ग्रामीण भागातील काेराेना रुग्णांना कार कम ॲम्बुलन्समधून जिल्हास्तरावरच्या रुग्णालयात पाेहाेचविले तेही अगदी माेफत. चार महिने अहाेरात्र हा उपक्रम राबिवला. त्या काळात मास्क, सॅनिटायझरचे निशुल्क वितरण गावागावांत केले. निशिकांत बडवाईक असे या ध्येयवेड्या शिक्षकाचे नाव असून माेहाडी तालुक्यातील सकरला जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. आजही सामाजिक जाणिवेतून कुणाच्याही मदतीला धावून जातात. काेराेना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात भंडारा जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार उडाला हाेता. रुग्णालय हाऊसफुल्ल झाले हाेते. ग्रामीण भागातून शहरापर्यंत रुग्णाला आणण्यासाठी माेठे पैसे माेजावे लागत हाेते. ही बाब संवेनशील मनाचे शिक्षक निशिकांत बडवाईक यांना दिसली. त्यातूनच प्रेरणा घेत त्यांच्याकडे असलेल्या कारची त्यांनी ॲम्बुलन्स केली. ग्रामीण भागातील रुग्णांना निशुल्क भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणत हाेते. तीन महिन्याच्या काळात त्यांनी जवळपास ५० काेराेनारुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी कुणाकडूनही एक पैसाही घेतला नाही. डिझेल आणि चालकाचा खर्चही त्यांनी आपल्या पगारातून केला. याच काळात त्यांनी पदरमाेड करीत काेराेनाबाबत मार्गदर्शन करून मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण केले. शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असताे. शिक्षक हा संवेदनशील असल्याने समाजातील बऱ्यावाईट घटनांचे भान त्याच्या लवकर लक्षात येते. शाळेतून बाहेर आल्यावर ताे समाज शिक्षक असताे. याच जाणिवेतून काेराेना काळात निशिकांत बडवाईक यांनी रुग्णसेवा केली. शिक्षकदिनी भलेही त्यांना पुरस्कार मिळणार नाही, परंतु काेराेनारुग्ण रुग्णालयातून ठणठणीत बरा हाेऊन परत आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पुरस्कारापेक्षाही माेठे आहे, असे निशिकांत बडवाईक सांगतात.

रुग्णाचा फाेन आला की कार ॲम्बुलन्स दारात - निशिकांत बडवाईक सांगतात काेराेना काळात ग्रामीण भागातून कुणाचाही फाेन आला की, आपली कार ॲम्बुलन्स अवघ्या काही वेळात त्याच्या दारात उभी राहत हाेती. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतरच समाधान लाभत हाेते. या काळात स्वत:ची काळजी घेण्यासाठी आपण पीपीई कीट घेतली. चालकालाही याेग्य मार्गदर्शन केले. श्रीमंतांना सहज वाहन उपलब्ध हाेते. मात्र गाेरगरिबांचे काय या जाणिवेतून आपण ही सेवा केली. त्यात आपण माेठे काहीच केले नाही, असे विनम्रपणे निशिकांत बडवाईक सांगतात.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTeacherशिक्षक