लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: धुररहित घर, वायू प्रदर्शनाची कमी, स्वस्थ इंधन व महिलांची सुरक्षितता व सशक्तीकरण हे प्रमुख पाच उद्देश प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी या योजनचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.ग्रामस्वराज अभियानांतर्गत उज्ज्वला दिनानिमित्त प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथे कोचे गॅस एजन्सी भंडाराच्या वतीने लाभार्थीना गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य निळकंठ कायते होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गॅस एजन्सीचे संचालक डी.एफ. कोचे, हिंदुस्थान पेट्रोलियमचे वरिष्ठ अधिकारी सुधाकर दोनाडकर, सरपंच विजय वासनिक, पत्रकार देवानंद नंदेश्वर, धारगाव प्राथमिक आरोग्य केद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा शहारे, सामाजिक कार्यकर्ता अमृत बन्सोड, ग्रामपंचायत सदस्या छाया वाहणे, प्रियंका टेंभूर्णे उपस्थित होते.यावेळी सुधाकर दोनाडकर यांनी धुरयुक्त चुलीमुळे होणाºया दुष्परिणाम व गॅस शेगडीमुळे होणाºया फायद्याची उपस्थितांना माहिती दिली. डॉ.प्रतिभा शहारे यांनी धुरामुळे होणाºया महिलांच्या विविध आजारांविषयी सविस्तरपणे सांगितले.नीळकंठ कायते यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंमलबजावणीकरिता गावकºयांनी संबंधित अधिकाºयांना सहकार्य करून आपले गावातील घरे धुरमुक्त करावी आणि इतरही शासकीय योजनेविषयी सजग राहावे, असे प्रतिपादन केले.यावेळी प्रियंका टेंभुर्णे व संगीता पेशने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अतिथींच्या हस्ते टोकन स्वरुपात पद्मा जनबंधू, पुष्पा मदनकर, जनाबाई भोयर, शीला रामटेके, सुरेखा गायधने या महिला लाभार्थिंना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले.दरम्यान यापूर्वीच गॅस कनेक्शन असलेल्या अरविंद मस्के व संतोष मेश्राम यांच्या घरी भेटी देऊन अधिकाºयांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कार्यक्रमाला महिला व पुरुषांची लक्षणीय उपस्थिती होती. त्यानंतर गावातील इतर लाभार्थिंच्या घरी गॅस कनेक्शन लावून देण्यात आले.कार्यक्रमाचे सुरेख संचालन अमृत बन्सोड यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कोचे गॅस एजन्सीचे डी.एफ. कोचे यांनी केले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सचिव एस. एस. हातझाडे, डाटा आॅपरेटर विनोद पोटवार, रोजगार सेवक कुणाल गेडाम, शिपाई रुस्तम टेंभूर्णे तसेच गॅस एजन्सीचे कर्मचारी विनोद राहाटे, अमोल राहाटे, विनोद फुले, विशाल दानी आदींनी सहकार्य केले.
उद्देशपूर्तीसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:56 PM
धुररहित घर, वायू प्रदर्शनाची कमी, स्वस्थ इंधन व महिलांची सुरक्षितता व सशक्तीकरण हे प्रमुख पाच उद्देश प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी या योजनचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.
ठळक मुद्देरामचंद्र अवसरे : उज्ज्वला दिनानिमित्त खुटसावरी येथे गॅस कनेक्शनचे वाटप