शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
2
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
3
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
4
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
6
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
7
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
8
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
10
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
11
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
12
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
13
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
14
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
15
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
17
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
18
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
19
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
20
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

सत्तेच्या माध्यमातून गावाच्या विकासाला प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:17 AM

लोकशाहीत सरपंचाला मोठया प्रमाणात आधिकार देण्यात आले आहेत. योजनांचा निधी थेट गावाला मिळायला लागला आहे.

ठळक मुद्देनाना पटोले यांचे आवाहन : आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे आदिवासी सरपंच मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकशाहीत सरपंचाला मोठया प्रमाणात आधिकार देण्यात आले आहेत. योजनांचा निधी थेट गावाला मिळायला लागला आहे. चौदाव्या वित्त आयोगात ग्रामसभेला अमर्याद अधिकार प्रदान करण्यात आले आहे. सरपंचपदाची मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत सर्वांना विश्वासात घेऊन सत्तेच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करा, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.आदिवासी विकास विभाग एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्यावतीने आयोजित सरपंच मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार चरण वाघमारे, आ.रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, प्रकल्प अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, विवेक नागभिरे, प्रभुदास सोयाम, दिनेश शेराम, श्याम कार्लेकर, अशोक उईके, बिसन सयाम, डॉ.श्याम वरखडे व जगदीश मडावी उपस्थित होते.यावेळी पटोले म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात ६७ गावात आदिवासी सरपंच तर १३० ग्रामपंचायत सदस्य निवडून आले. लोकांनी आपल्याला सेवेची संधी दिली आहे. त्यामुळे गावाच्या विकासाची जबाबदारी पार पाडायची आहे. पदाच्या माध्यमातून विकास हा उद्देश डोळयासमोर ठेऊन कामे करा. शासकीेय योजनांचा अभ्यास करून व अंमलबजावणी करा. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र व सुसज्ज ग्रंथालय उभारण्याच्या सूचना त्यांना संबंधित विभागाला केल्या.यावेळी आ.चरण वाघमारे म्हणाले, गावाच्या विकासाची जबाबदारी व संधी आपल्याला आहे. गावाच्या योजना व अर्थसंकल्प समजून घ्या. कायदे व अधिकार जाणून घ्या. ग्रामसभा कशी चालवायची याबाबत अभ्यास करा. योजनेचा निधी व ग्रामसभेचा ठराव याबाबत जागृत राहा. त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे स्त्रोत जाणून घ्या. शासनाच्या योजनांचा प्रसार व प्रचार सरपंचामार्फत व्हावा. सरपंचांनी प्रत्येक व्यक्तीपर्यंत योजनांची अंमलबजाणी करावी.जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शिका, शहाणे व्हा आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग लोक कायार्साठी करा, असा सल्ला दिला. गावात रोजगाराची संधी कशा निर्माण होतील या अनुषंगाने सरपंचांनी काम करावे. पुढील काळ हा कौशल्य विकासाचा असून तरूण आणि महिलांच्या हाताला काम देण्याचे दायित्व गावाचा कारभारी म्हणून सरपंचावर आहे. लोकांच्या अडचणी समजून काम करावे, असे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यवंशी म्हणाले, मिळालेल्या गावसेवेच्या संधीचे सोने करा. सरपंचांनी अधिकाराचा योग्य वापर केल्यास गावाचे नंदनवन करण्याची संधी आहे. जिल्हा परिषदमार्फत सरपंचांचे प्रशिक्षण घेण्यात येईल, असे सांगितले.या कार्यक्रमात सरपंचांना योजनांची माहिती पुस्तिका देण्यात आली. डॉ.श्रीकांत गोडबोले व संशोधन अधिकारी मिलिंद नारिंगे यांनी आदिवासी विभागाच्या विविध योजना, सरपंचाचे अधिकार, अंमलबजावणीची कार्यपध्दती याबाबत सरपंचांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणाले, शासन आणि लोकांमधील महत्त्वाचा दुवा सरपंच आहे. त्यामुळे आदिवासी विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्याला जिल्ह्यातील आदिवासी प्रवर्गातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्य व आदिवासी बांधव उपस्थित होते.