देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी या संकटाला सामोरे जात आहे. या परिस्थितीत खासगी क्षेत्रातील डॉक्टर माणुसकीचा परिचय देत रुग्णांवर २४ तास सेवा देत आहेत. या काळात काही मोजकी मंडळी रुग्णसेवा नाकारत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र भंडारा येथील बालरोग तज्ज्ञ यशवंत लांजेवार बालकांच्या उपचारासाठी आपल्या परिने सेवा देऊन अनेक रुग्णांची उमेद जागवित आहेत.कोरोनाचे नाव घेताच प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. सर्वत्र रुग्णांची संख्या वाढत आहे. साधा ताप आणि खोकला झाला तरी अनेकांची पाचावर धारण बसते. सीटी केअर हॉस्पीटलमध्ये तपासणीसाठी येताच चेहऱ्यावर प्रचंड तणाव आणि घाबरलेल्या अवस्थेत रुग्ण येतात. मात्र येथे येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांची डॉ.यशवंत गोपाळराव लांजेवार आपुलकीने संवाद साधून रुग्णांवर उपचार करीत आहेत. रुग्ण दवाखान्यात दाखल झाल्यास प्रथम हँडवॉश, सॅनिटायझर करतात. त्यानंतर रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबियांचा प्रवेश होतो. येथे गर्दी लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जाते. देशात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला असताना काही डॉक्टर मंडळी रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करतात. मात्र सीटी केअर हॉस्पीटलमध्ये बालरुग्ण सेवा नियमितपणे सुरु ठेवली आहे. तपासणी नेहमीप्रमाणेच असली तरी कोरोना हा संसर्गजन्य असल्याने रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना सावधगिरीचा उपाय म्हणून स्वच्छता व उपाययोजना पाळण्याचे नेहमीच आवाहन करण्यात येत आहे. आरोग्य सेवेत असणाºया अडचणीत शासनाने दुर कराव्या यासाठी नेहमी ते अग्रेसर असतात. सध्या पीपीएचा तुटवडा असून त्याचा रुग्णांना फटका बसू शकतो यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सध्या कोरोना संसर्गाची सर्वत्र धास्ती पसरली आहे. अशा परिस्थितीत अनेक जण रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचे टाळत आहे. मात्र कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ रुग्णालयात जावून उपचार करणे गरजेचे असल्याचे डॉ. लांजेवार यांनी सांगितले.कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय मंडळींनी एका योद्ध्याप्रमाणे सेवा देण्याची आज काळाची गरज आहे. खासगी, सरकारी असा भेद न ठेवता रुग्णसेवा हीच खरी सेवा समजून कोरोनाच्या लढाईत सहभागी व्हावे. हात वारंवार धुणे, शिंकताना व खोकलताना रुमालाचा वापर करणे आदी उपाययोजना आज राबविल्या जात असल्या तरी आरोग्याच्या दृष्टीने हे कार्य निरंतर कायम ठेवावे तसेच संस्कार पालकांनी मुलांमध्ये रूजविणे काळाची गरज आहे.डॉ.यशवंत लांजेवार, बालरोग तज्ज्ञ सीटी केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, भंडाराडॉ. यशवंत लांजेवारयशवंत गोपाळराव लांजेवार हे मुळचे दवडीपार (बाजार) येथील रहिवासी असून सध्या ते भंडारा येथे वास्तव्यास आहेत. ते गत १२ वर्षांपासून आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी गव्हर्नमेंट मेडीकल कॉलेज अँड हॉस्पीटल नागपूर येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. २००२ मध्ये इंटरशिप पूर्ण केल्यानंतर त्यांनी गडचिरोली, भंडारा येथील रुग्णालयात प्रत्येकी अडीच वर्ष सेवा दिली. त्यानंतर ते भंडारा जिल्हा रुग्णालयात सेवा दिली. गत चार वर्षांपासून भंडारा येथील सीटी केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून ते सेवा देत आहेत. त्यांचे वडील गोपाळराव हे सेवानिवृत्त शिक्षक असून आई गृहिणी आहेत. त्यांची पत्नी नेत्ररोग तज्ज्ञ असून त्यांना मुलगा अर्णव आणि मुलगी अपरा अशी दोन अपत्य आहेत. रुग्णसेवेसाठी नेहमी धडपडणारे डॉक्टर यशवंत लांजेवार यांचा जिल्ह्यात नावलौकीक आहे.
खासगी डॉक्टर देत आहेत माणुसकीचा परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 5:00 AM
कोरोनाचे नाव घेताच प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. सर्वत्र रुग्णांची संख्या वाढत आहे. साधा ताप आणि खोकला झाला तरी अनेकांची पाचावर धारण बसते. सीटी केअर हॉस्पीटलमध्ये तपासणीसाठी येताच चेहऱ्यावर प्रचंड तणाव आणि घाबरलेल्या अवस्थेत रुग्ण येतात. मात्र येथे येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांची डॉ.यशवंत गोपाळराव लांजेवार आपुलकीने संवाद साधून रुग्णांवर उपचार करीत आहेत.
ठळक मुद्देकोरोना संकटातील देवदूत, बालकांच्या उपचारासाठी भंडारा शहरात २४ तास सेवा