लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : नागपुरातील नागनदीच्या प्रदुषणामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदुषीत झालेले आहे. हे प्रदुषीत पाणी पवनी तालुक्यातील २५ गावांना, पवनी शहर, भंडारा शहर आदींना नाईलाजाने प्यावे लागत आहे. परिणामी नागनदीच्या प्रदुषणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.नागपूर शहरातून वाहणाऱ्या नागनदी मध्ये शहरातील ३४५ ते ३६५ एमएलडी सांडपाणी दररोज सोडले जाते. हे सांडपाणी नागनदी सोबत अन्य चार नद्यांसोबत आंभोरा येथे वैनगंगा नदीला मिळते. हे प्रदूषीत झालेले वैनगंगा नदीचे पाणी विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणात जमा होते.नागनदीच्या प्रवाहामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झालेले आहे. हे प्रदूषित झालेले पाणी दूरपर्यंत, भंडारा शहरापर्यंतपसरले आहे. पवनी तालुक्यातील २५ गावे व भंडारा तालुक्यातील अनेक गावातील पाणी प्रदुषीत झाले आहे. येथील लोकांना विषमज्वर, कावीळ आदी आजारांची नेहमी लागण होत असते. काठावरील गावाजवळ डासांची मोठ्या प्रामणात या प्रदुषीत पाण्यामुळे निर्मीती झाली आहे. त्यामुळे मलेरीया, विषाणुजन्य ताप, डेंगू सदृष ताप आदींशी येथील जनतेला नेहमी सामना करावा लागतो.या प्रदुषीत पाण्याचा फटका भंडारा शहर, पवनी शहर व अनेक गावांना बसत आहे. हे प्रदुषीत पाणी नाईलाजाने येथील जनतेला प्यावे लागत आहे. नागनदीचे प्रदुषण थांबवीण्याकरीता नागपूर महानगर पालीकेने केंद्र सरकार कडे पाठवीलेला १३२८ कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर ही झाला. पण अजुनपर्यंत अंमलबजावणी न झाल्यामुळे नागनदीचे प्रदुषण कमी झालेले नाही व उलट वाढलेले आहे.विद्यमान परिस्थितीत पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल, यात शंका नाही. दिवसेंगणिक पाण्याची पातळी कमी होत असताना जीवनदायीनी नद्यांचे पाणीही दूषित झाले आहे. ही मानवासह जलचरांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. विस्तीर्ण पात्र लाभलेल्या वैनगंगा नदीच्या पाण्याचे नमुने निरीनेही तपासणीसाठी पाठविले होते. त्यात आरोग्याच्या दृष्टीने बाधक ठरतील, असे तत्व आढळले होते. शासन व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून नागनदीच्या प्रदूषणावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.-मो.सईद शेख, पर्यावरण अभ्यासक
नागनदीच्या प्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 12:52 AM
नागपुरातील नागनदीच्या प्रदुषणामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदुषीत झालेले आहे. हे प्रदुषीत पाणी पवनी तालुक्यातील २५ गावांना, पवनी शहर, भंडारा शहर आदींना नाईलाजाने प्यावे लागत आहे. परिणामी नागनदीच्या प्रदुषणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ठळक मुद्देअनेक गावांना प्रदूषित पाण्याचा फटका । गोसेखुर्दमधील नागनदीचे प्रदूषण कायम बंद व्हावे