मानेगाव बाजार : जिल्हाधिकारी धिरजकुमार यांनी पशुवैद्यकिय दवाखाना मानेगाव बाजार ला भेट दिली. पशुवैद्यकिय दवाखान्याच्या परिसराची पाहणी केली. दवाखान्यात उपस्थित पशुपालकांशी चर्चा केली.ग्रामपंचायतचे परिसरात वृक्षाची लागवड केली. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे जि. प. अध्यक्षा वंदना वंजारी, उपविभागीय डॉ. संपत खिलारी, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जेजूरकर, तहसीलदार, खंडविकास अधिकारी मंजूषा ठवकर यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी यांनी गावकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व समाधान शिबिर आयोजित करुन गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)
जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या पशुपालकांच्या समस्या
By admin | Published: June 10, 2015 12:36 AM