लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागपूर शहरातील सांडपाणी नाग नदीद्वारे गोसेखुर्द धरणामध्ये जावून मिळत आहे. या धरणाचे बॅक वॉटर वैनगंगा नदीला मिळत असल्यामुळे नदीचे पाणीही दूषित झाले आहे. त्यामुळे मौदा येथील एनटीपीसीचे संचालक नंदा यांच्याशी चर्चा करून नाग नदीवर मलनि:स्सारण केंद्र स्थापन करण्यात यावे, या मागणीचे निवेदन आमदार डॉ.परिणय फुके यांनी त्यांना दिले.भंडारा जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे होणाºया त्रासापासून सुटका व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी डॉ.परिणय फुके यांना साकडे घातले. लोकांची मागणी लक्षात घेऊन आणि दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आ.परिणय फुके यांनी एनटीपीसीचे कार्यकारी संचालक नंदा यांच्याशी चर्चा करून नाग नदीवर मलनिस्सारण केंद्र स्थापन करण्यात आले तर मौदा एनटीपीसीला आर्थिकदृष्ट्या होणारे फायदा डॉ.फुके यांनी समजावून सांगितले.या चर्चेत कार्यकारी संचालक नंदा यांनी सकारात्मक सहमती दर्शविली. त्यानंतर यासंदर्भात भंडाराचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी चर्चा करून याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी आ.फुके यांनी कार्यकारी संचालक नंदा यांना सांगितले. यावेळी एनटीपीसीचे ओअँडएम विभागाचे राव, त्रिपाठी, मौदा नगर परिषदचे मुख्याधिकारी डाके हे उपस्थित होते.
गोसेखुर्दच्या समस्या मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 11:19 PM
नागपूर शहरातील सांडपाणी नाग नदीद्वारे गोसेखुर्द धरणामध्ये जावून मिळत आहे. या धरणाचे बॅक वॉटर वैनगंगा नदीला मिळत असल्यामुळे नदीचे पाणीही दूषित झाले आहे.
ठळक मुद्देपरिणय फुके : मलनि:स्सारण केंद्र स्थापण्यासाठी पुढाकार